घरमहाराष्ट्रबेरोजगारांसाठी खुशखबर ; SBI मध्ये मिळेल नोकरी, तब्बल साडेआठ हजार लिपिक पदांसाठी...

बेरोजगारांसाठी खुशखबर ; SBI मध्ये मिळेल नोकरी, तब्बल साडेआठ हजार लिपिक पदांसाठी भरती

Subscribe

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 20 नोव्हेंबर रोजी लिपिक पदांच्या पदभरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

मुंबई : एकीकडे महागाई वाढत असून, दुसरीकडे बेरोजगारीचा भस्मासूर कुटुंबच्या कुटुब उद्धवस्त करत असल्याचे चित्र उभे करत विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत असतात. याच गदारोळात आता बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी पुढे आली आहे. ती म्हणजे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये तब्बल 8 हजार 773 लिपिक पदांच्या जागांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा अनेकांचे आता बॅंकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. (Good news for the unemployed Jobs will be available in SBI recruitment for about eight and a half thousand clerical posts)

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 20 नोव्हेंबर रोजी लिपिक पदांच्या पदभरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 8 हजार 773 लिपिक पदांच्या जांगाच्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून, यामध्ये 17 नोव्हेंबर 2023 पासून या भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर 7 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. याच जाहिरातीत नियम व अटींचाही समावेश करण्यात आला असून, तेव्हा पदभरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी ही पदभरती एका सूवर्णसंधीपेक्षा कमी नसल्याचे दिसून येत आहे. या जागांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे.

- Advertisement -

अर्ज करण्याआधी याकडे लक्ष द्या

एसबीआयने प्रसिद्ध केलेल्या लिपिक पदाच्या पदभरतीत सर्व नियम व अटींचा समावेश केला आहे. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे, एकूणच उमेदवाराचा जन्म हा 2 एप्रिल 1995 पूर्वी झालेला नसावा. असे जरी असले तरी मात्र, विविध प्रवर्ग आणि निकषांच्या आधारे उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा : एसटी बस चालवतांना फोनवर बोलाल तर खबरदार; महामंडळाकडून थेट कारवाईचा इशारा

- Advertisement -

बघा तुम्ही या प्रवर्गात, निकषात बसता का?

एसबीआयने प्रसिद्ध केलेल्या लिपिक पदांच्या पदभरती संदर्भातील जाहिरातीत नमूद केले आहे की, अर्ज करणारा उमेदवार 28 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा पंरतू ही अट काही प्रवर्गांसाठी शिथिल करण्यात आली असून, यामध्ये SC/ST वर्गासाठी 5 वर्षे, ओबीसींसाठी 3 वर्ष, PwBD (जनरल/ EWS) साठी दहा वर्ष, PwBD (SC/ST) 15 वर्षे, PwBD (OBC) 13 वर्षे, माजी सैनिक 8 वर्षे, कमाल अधीन वय 50 वर्षे, विधवा, घटस्फोटित महिला OBC साठी 38 वर्षे वर्षे आणि SC/ST उमेदवारांसाठी 40 वर्षे, SBI चे प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी SC/ST 6 वर्षे, OBC 4 वर्षे, GEN/EWS 1 वर्ष, PwBD (SC/ST) 16 वर्षे, PwBD (OBC) 14 वर्षे,PwBD (Gen/EWS) 11वर्षे अशी सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा : अजित पवारांकडून दाखल प्रतिज्ञापत्रात शरद पवारांना विरोधच नाही; सुनावणीनंतर माहिती उघड

 

निवडीसाठी हे अडथळे करावे लागणार पार

एसबीआयने 8 हजार 773 जागांच्या लिपिक पदांसाठी पदभरतीच्या जाहिरातीतच उमेदवारांची निवड कशी केली जाणार याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्राथमिक परीक्षा निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी आणि निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणीचा समावेश असेल.ऑनलाइन प्राथमिक परीक्षेत 100 गुणांच्या वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. या चाचणीचा कालावधी 1 तास आहे आणि त्यात तीन विभाग आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -