घरताज्या घडामोडीपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूशखबर

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूशखबर

Subscribe

गणेश मंडपांचे शुल्क माफ

मुंबई महापालिकेने घरगुती गणेशमूर्तीची २ फुटांपर्यंतच्या उंचीबाबत घातलेले निर्बंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने उठवले आहेत. तसेच, गणेश मंडपासाठी आकारण्यात आलेले आणि येणारे १०० रुपये शुल्कही माफ करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने गणेशोत्सवासाठी सुधारीत मार्गदर्शिका जारी केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक व गणेशोत्सवही तोंडावर आलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरीलप्रमाणे निर्णय घेऊन गणेशोत्सव मंडळांना व गणेश भक्तांना खुशखबर दिली आहे.

पालिकेने गणेशोत्सवासाठी जारी केलेल्या सुधारीत मार्गदर्शिकेनुसार, श्रीगणेश मंडळांच्या मंडपांच्या परवानगीसाठी १०० रुपये शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. तसेच यापूर्वी गणेशोत्सव मंडपांच्या परवानगीकरिता मंडळांनी शुल्क भरून परवानगी प्राप्त केली असेल तर अशा मंडळांना १०० रुपयांचा परतावा लवकरच करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाकरिता मूर्तिकारांच्या मंडपासाठीचे शुल्क प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडून पूर्णपणे माफ करण्यात येईल. तसेच ज्यांनी याअगोदर शुल्क भरले असेल तर त्यांना शुल्काचा परतावा करण्यात येईल.

- Advertisement -

गणेशोत्सवाकरिता अनुज्ञापन खात्यामार्फत आकारण्यात येणारे जाहिरात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल. तसेच ज्यांनी या अगोदर शुल्क भरले असेल तर त्यांना या शुल्काचा परतावा करण्यात येईल. महापालिकेच्या मंडप उभारणी बाबत उद्यान खाते व मालमत्ता खाते व खासगी भूखंडावर आकारण्यात येणारे शुल्कदेखील माफ करण्यात येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध यंदाच्या गणेशोत्सवाकरिता असणार नाहीत.

तसेच, घरगुती गणेशमूर्तीसाठी या अगोदर २ फुट उंचीची घातलेली मर्यादा आता हटविण्यात आली आहे. मात्र घरगुती मूर्तीच्या उंचीवर स्वखुशीने २ फुट उंचीची मर्यादा पाळण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, नैसर्गिक विसर्जन स्थळी व कृत्रिम विसर्जन स्थळी महापालिकेमार्फत विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. श्रीगणेश आगमन व विसर्जन रस्त्यांवर संबंधित वीज पुरवठादार यांच्यामार्फत विजेच्या व्यवस्थतेबाबत संबंधित विभागीय सहा. आयुक्त यांच्यास्तरावर चर्चा करुन आवश्यक ती सुधारणा (दिवा बत्तीची संख्या व क्षमता) करण्यात येणार आहे. मंडप शुल्क माफ करण्यात आले असले तरीसुध्दा विविध परिपत्रकांमध्ये असलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -