मुंबई : रस्ते अपघात झाल्यानंतर ‘गोल्डन अव्हर’मध्ये अपघातग्रस्तांना मदत करणे आवश्यक असते. मात्र, चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीनं काहीजण अपघातग्रस्तांना मदत करणे टाळतात. तसेच, पोलिसांनीही माहिती देत नाही. त्याच पार्श्वभूमीवर अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना आतापर्यंत 5 हजार रूपये दिले जायचे. आता ही रक्कम वाढवून 25 हजार रूपये करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नितीन गडकरी म्हणाले, “वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड ठोठावला, कायदे कडक केले; तरीही रस्ते अपघातातील मृत्यू थांबलेले नाहीत. मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत आपण यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. शालेय शिक्षण घेण्याच्या वयात मुलांवर चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडला, तर तो कायमस्वरूपी राहतो. त्यामुळे शाळेय जीवनात वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणे आवश्यक आहे.”
हेही वाचा : वाल्मिक कराडच्या पत्नीनं जरांगे-पाटलांना सुनावलं; म्हणाल्या, मराठा, मराठा काय करतो, मीही…
“कोरोना, युद्धात जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसेल, तेवढे मृत्यू दरवर्षी रस्ते अपघातात होतात, याची खंत वाटते. भारतात 10 विद्यार्थी हे सदोष ट्रॅफिक व्यवस्था, तर 30 हजार विना हेल्मेटमुळे दगावतात,” अशी माहिती गडकरींनी दिली आहे.
“देशात आणखी उत्तम रस्ते तयार होती. पण, लोकांना शिस्त नसेल, तर याचा काहीही उपयोग नाही. सिग्नल तोडणे, वेग मर्यादा ओलांडणे, हेल्मेट नसणे, अशा कितीतरी चुका लोक करतात. घरी आई, पत्नी, मुले वाट बघत असतील, हे ध्यानात ठेवून गाडी चालवावी, असा सल्ला गडकरींनी जनतेला दिला आहे.
गडकरींनी अलीकडेच रस्ते अपघातग्रस्तांसाठी योजना केलेली जाहीर…
अपघातग्रस्तांवर मोफत ( कॅशलेस ) आणि तातडीनं उपचार होण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवी योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत अपघात झाल्यावर 24 तासांच्या आत पोलिसांना माहिती द्यावी लागणार आहे. मगच पीडितांच्या उपाचाराचा 7 दिवस किंवा दीड लाखांपर्यंतचा खर्च केंद्र सरकारतर्फे केला जाणार आहे, ही एकच अट या योजनेत असणार आहे.
धनदांडग्यांच्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात एखाद्या निरपराधाचा मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबाला 2 लाख रूपये मिळतील, अशी घोषणाही गडकरी यांनी केली आहे.