घरताज्या घडामोडीजे देव-धर्म मानत नाहीत त्यांच्या हस्ते स्मारकाचं अनावरण कसं होईल?, गोपीचंद पडळकरांचा...

जे देव-धर्म मानत नाहीत त्यांच्या हस्ते स्मारकाचं अनावरण कसं होईल?, गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांना टोला

Subscribe

सांगलीमध्ये अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा २ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पार पडणार होता. परंतु स्मारकाच्या अनावरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीत खडाजंगी होतान पहायला मिळाली. जे देव-धर्म मानत नाहीत त्यांच्या हस्ते स्मारकाचं अनावरण कसं होईल?, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित करत शरद पवारांना टोला लगावला आहे.

जे देव-धर्म मानत नाहीत त्यांच्या हस्ते स्मारकाचं अनावरण कसं होईल?

शरद पवारांचं काम हे अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारसरणीच्या पूर्णत: उलटं आहे. अहिल्यादेवींनी देश आणि धर्म यासाठी काम केलं. जेव्हा जेव्हा या देशामध्ये परकीय आक्रमणं झाली. तसेच या देशातील मंदिरं उद्धवस्त केली गेली. त्या सर्व मंदिराच्या जीर्णोद्धराचं काम अहिल्यादेवींनी केलं. मात्र, शरद पवार हे धर्म आणि देवचं मानत नाहीत. त्यामुळे जो माणूस देव आणि धर्मचं मानत नाही, त्यांच्या हस्ते सोहळा होणं हे कितपण योग्य आहे, असा सवाल पडळकरांनी विचारला.

- Advertisement -

ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी दाऊदसोबत हस्तांदोलन केलं आणि मुंबईमध्ये बॉम्बस्फोट हल्ले घडवले. त्यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला. अशा लोकांना येथे येऊन द्यायचं का?, जे जातीयवादी आणि भ्रष्टाचारवादी आहेत त्यांच्या हातून उद्घाटन करण्याचं कारण काय, असं पडळकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा वापरण्याचं काम ?

गोपीचंद पडळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. २ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते सांगलीत स्मारकाचं अनावरण होणार आहे. मात्र, हा सोहळा २७ मार्चला घेण्यामागचं कारण काय?, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता. तेव्हा पडळकर म्हणाले की, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे अजेंडा वापरण्याचं काम करत आहे. पहिल्यांदा सर्वपक्षीय लोकांची बैठक घेणं अपेक्षित होतं. मात्र, त्यांनी कोणतीही सूचना न देता महापौरांनी डायरेक्ट कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे येथील स्थानिक नगरसेवकांनी त्यांच्या या कार्यक्रमाला विरोध केला, असं पडळकर म्हणाले.

- Advertisement -

पवारांपेक्षा आम्हाला मेंढपाळ महत्त्वाचा

सर्वसामान्य मेंढपाळाच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी पवार आणि त्यांच्या पक्षाचा विरोध का आहे. त्याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना द्यावं. पवारांपेक्षा आम्हाला मेंढपाळ महत्त्वाचा आहे. आमच्या पत्रिकेमध्ये कोणत्याही पुढाऱ्याचं आणि नेत्याचं नाव नाहीये. स्मारकाच्या कार्यक्रमामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. राष्ट्रवादीला राजकारण करायचं आहे. पण हे सर्व आम्ही हाणून पाडणार आहे. सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन आम्ही हे लोकर्पण २७ मार्च रोजी ४ वाजता करणार आहोत.

प्रशासन हे सरकार सांगतंय त्या पद्धतीने वागतंय. प्रशासन हे कायद्याप्रमाणे वागत नाही. कारण जेव्हा माजी महापौर आणि नगरसेवक महापौरांकडे गेले. तसेच त्यांनी कार्यक्रमाबाबतची विचारपूस आयुक्तांकडे केल्यानंतर हा कार्यक्रम आमचा नाहीये, असं आयुक्तांनी सांगितलं. याचाच अर्थ हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा २७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता घेण्याचं महाराष्ट्रातील तमाम लोकांनी ठरवलं आहे. बैठकांना देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा सोहळा २७ मार्चला निश्चितपणाने होणार यासाठी आम्ही तयारी झालेली आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.


हेही वाचा : Maharashtra Budget Session 2022 Live Update: विधानसभेत लक्षवेधी चर्चा सुरू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -