घरताज्या घडामोडीST Workers Strike : कालची घटना नियोजनबद्ध होती, गोपीचंद पडळकरांचा आरोप

ST Workers Strike : कालची घटना नियोजनबद्ध होती, गोपीचंद पडळकरांचा आरोप

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. तसेच राजकीय वातावरणात खळबळ उडालेली दिसत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरण्याबाबतच्या मागणीला पाठिंबा दिला होता. दरम्यान, कालची घटना नियोजनबद्ध होती, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, एसटी कामगारांसोबत आम्ही कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत. पोलीस चौकशीतून सत्य बाहेर येईल. मात्र, कालची घटना नियोजनबद्ध होती, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावरती आंदोलन होणं या गोष्टीचं कोणी समर्थन करत नाही. त्यांच्या घरावरती आंदोलन होणं याचं मी समर्थन करत नाहीये. परंतु तिथपर्यंत इतके आंदोलक पोहोचत आहेत. म्हणजेच सरकारमधल्या लोकांचा यामध्ये सहभाग आहे का, असा सवाल पडळकरांनी विचारला.

या प्रकरणी मीडियाला माहिती मिळते. परंतु मुंबई पोलिसांना याबाबत सुगावा लागत नाही. त्यामुळे यामध्ये मला काहीतरी गौड बंगाल वाटतंय. भारतीय जनता पार्टीचे असे संस्कार नाहीयेत. माझ्या गाडीवर दोन वेळा हल्ला झाला. तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचं समर्थन केलं. मात्र, आम्ही या गोष्टीचं समर्थन करत नाही. अशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं आंदोलन करायचं असल्यास लोकशाही पद्धतीनं करावं. कोणत्याही नेत्याच्या घरावर जाऊन करू नये, हीच आमची भूमिका आहे, असं पडळकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : ST Workers Strike : आधी जल्लोष, मग नंतर आंदोलन का? आंदोलकांना कुणीतरी भडकवतयं- अजित पवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -