घरताज्या घडामोडी'तो' पक्ष गुंड लोकांनाच सांभाळतो, इस्लामपुरातील घटनेनंतर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

‘तो’ पक्ष गुंड लोकांनाच सांभाळतो, इस्लामपुरातील घटनेनंतर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Subscribe

इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने गोळीबार केल्याची घटना समोर आल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचा बेसच गुंडगिरीचा असून तो पक्ष गुंड लोकांनाच सांभाळतो, अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

गोपीचंद पडळकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणार असून कारवाईसाठी सूचना करणार आहे. राष्ट्रवादीचा बेसच गुंडगिरीचा आहे आणि अशाच गुंड लोकांना हा पक्ष सांभाळतो. पण सरकार बदलले आहे, हे त्यांच्या लक्षात नसावं. अशा गुंडगिरी करणाऱ्या लोकांवर कारवाई होईल, असं पडळकर म्हणाले.

- Advertisement -

इस्लामपूर येथील मोमीन मोहल्ला परिसरात कव्वाली कार्यक्रमामध्ये हा गोळीबार झाला होता. व्यासपीठावरुन कव्वाली सुरु असताना हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ समोर आला होता.

इस्लामपूर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे. पीरअली पुणेकर असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. हत्यार परवाना शर्तीचे आणि शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचा हवेत गोळीबार झालेल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल, नेमकी काय आहे रणनीती?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -