घरमहाराष्ट्र'पवारांच्या घरातच उभी फूट...' गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

‘पवारांच्या घरातच उभी फूट…’ गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Subscribe

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबावर टीकास्त्र डागले आहे. सत्ता गेल्यानंतर इतकी चुळबुळ निर्माण झाली आहे की पवारांच्या घरातचं उभी फूट पडते की काय असे वातावरण राज्यात निर्माण झाल्याचा हल्लाबोल पडळकर यांनी केला आहे. सांगलीत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भावे नाट्यगृहात पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना पडळकरांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला आहे.

तुम्ही राज्यातली एवढी घर फोडली आहे, त्यामुळे जे पेरलं तेच उगवणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार पडळकरांनी व्यक्त केला.

- Advertisement -

पडळकर पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सांगली जिल्ह्यातील संघटनेची परिस्थिती वाईट आहे.
राष्ट्रवादीला शाखेपासून सुरुवात करण्याची वेळ आली आहे. एखाद्या रुग्णाला संधिवात झाल्यावर सूज येते. तशी सूज राष्ट्रवादीला गेल्या अडीच वर्षांत आली होती, पण सरकार गेल्यानंतर ती सूज आता एका झटक्यात ओसरुन गेली आहे.

अनेक नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत, पण सत्ता नसताना भाजपमधून कुणी फुटले नाहीत हे भाजपचे यश आहे. दरम्यान यावेळी पडळकरांनी रा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही हल्लाबोल करत म्हटले की, सांगली हा प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा असून ते स्वत:च निवडून येऊ शकतात. तासगावमध्ये सुमन पाटील आणि शिराळ्यात मानसिंगराव नाईक हे त्यांच्या हिंमतीवर निवडून येतात, जयंत पाटील यांच्या पाठीमागे फक्त प्राजक्ता तनपुरे आहे, बाकी कोण नाही. असा टोलाही पडळकरांनी लगावला.


कळवा खाडी पुलावरून राष्ट्रवादीकडून श्रेयवादाची लढाई; आव्हाड म्हणाले, आपले स्वप्न पूर्णत्वाला


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -