दोन वाढपे व्यवस्थित वाढत असतील तर ४० जणांची गरज काय? पडळकरांचा सवाल

वाळवा येथे क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने शुक्रवारी आयोजित समारंभात आमदार पडळकर बोलत होते.

Gopichand Padalkar alleges on thackeray government

“शिंदे सरकारचा आज- उद्या विस्तार होईल. मात्र हे चुलते-पुतण्याचे सरकार नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस जरी आता सरकार चालवत असले तरी ते दोघेही भारी आहेत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन वाढपे व्यवस्थित वाढत असतील तर ४० जणांची काय गरज आहे?” असा सवाल आमदार गोपीचंद पडाळकर यांनी उपस्थित केला. वाळवा येथे क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने शुक्रवारी आयोजित समारंभात आमदार पडळकर बोलत होते. (Gopichand Padalkar on cabinet expansion)

हेही वाचा – उगवत्या सूर्याच्या साक्षीने घेतलेले निर्णय, फडणवीसांची ठाकरे सरकारवर खोचक टीका

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले की, शरद पवार कधी घरी बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातोय अशी जयंत पाटलांची अवस्था झाली आहे. सत्ता गेल्याचे सूतक जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर दिसत असून सत्तेविना ते कामच करु शकत नाहीत. शरद पवार कधी घरी बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातो अशी त्यांच्या मनात घालमेल सुरु आहे.”

हेही वाचा – शिंदेंच्या मंत्रिमंडळातील चार महत्त्वाचे निर्णय, MMRDAला ६० हजार कोटींचे कर्ज

ते पुढे म्हणाले की, जयंत पाटलांमागे त्यांचा भाचा सोडल्यास कोणीही नाही. जिल्हा बँकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. नोकर भरतीत भ्रष्टाचार झालाय. त्यामुळे बँकेवर प्रशासक नियुक्तीची मागणी आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. हे चुलते-पुतण्याचे सरकार नाही –