घरमहाराष्ट्रगोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली राजधर्माची आठवण; म्हणाले...

गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली राजधर्माची आठवण; म्हणाले…

Subscribe

मुंबई : आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली होती. यासाठी राज्य सरकारने मराठ्याच्या कुणबीच्या नोंदणी शोधण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ज्या मराठ्याच्या कुणबी नोंदणी सापडल्या. त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. पण मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसीच्या नेत्यांनी विरोध केला आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्या पेटला असताना. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिला आहे. तुम्हाला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यावर आली आहे, असा थेट इशारा गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुमची ओळख ही संवेदनशील नेता अशी आहे. पण तुम्हाला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानुसार तुम्हाला सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्त्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती. राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबाजवणीसाठी 50 दिवस दिले होते. आणि याची मुदत संपली आहे. पण प्रशासकीय पातळीवर कोणत्याही हलचाली दिसून येत नाही. यामुळे विशिष्ट समाजासाठी तुम्ही काही करायची तयारी दाखवायची”, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – “बाळासाहेबांचा ‘मातोश्री’ बंगला स्मारक म्हणून जनतेसाठी खुला करावा”; भाजपची मागणी

महायुतीकडून धनगर समाजाच्या पदरी निराशा

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारने धनगर आरक्षण नाकरून अन्याय केला. तर महायुतीच्या सरकारमध्ये धनगर आरक्षणाची अंमलबाजवणी होईल, असे धनगर समाजाला वाटत होते. पण महायुतीकडून सामान्य धनगर समाजाच्या पदरी निराशा पडली असून धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरू असलेल्या योजना बंद आहेत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाल काढावा, अन्यथा धगनर समाजाच्या संविधानिक प्रक्रियेला आणि आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा हा राज्यातील 5 कोटी धनगर समाजाच्या वतीने मी तुम्हाला देत आहे”, असे गोपीचंद पडळकर म्हणले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -