संजय राऊतांसारख्या भाटाची धनगर समाजाला गरज नाही, पडळकरांची खोचक टीका

ओबीसी समाजाकरता फडणवीस सरकारने २३ जीआर काढले हे संजय राऊतांना माहिती नाही

gopichand Padalkar slams sanjay raut on dhangar reservation
संजय राऊतांसारख्या भाटाची धनगर समाजाला गरज नाही, पडळकरांची खोचक टीका

ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, पदोन्नती आरक्षणावरुन राज्य सरकारला भाजपकडून घेरण्यात आणि टीका करण्यात येत आहे. भाजपने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनावरुन राज्य सरकार आणि भाजप यांच्यात वाद निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीसांनी धनगर आरक्षणावरुनही असेच वक्तव्य केलं होत असे संजय राऊतांनी म्हटलं होते यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांसारख्या भाटाची धनगर समाजाला गरज नाही अशी खोचक टीका धनगर समजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, शिवसेना खासदार संजय राऊत खातो सेनेचं आणि जागतो पवारांना मुळात संजय राऊत यांच्यासारख्या भाटाची धनगर समाजाला अजिबात गरज नाही. मुळात जे अदिवासींना ते धनगरांना हे देवेद्र फडणवीस सरकारने १ हजार कोटीचे बजेट केलं होते. जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत परंतु त्यातला एकही रुपया संजय राऊतांच्या मालकानं दिलेला नाही. याबद्दल संजय राऊतांनी बोलायला पाहिजे. ओबीसी समाजाकरता फडणवीस सरकारने २३ जीआर काढले हे संजय राऊतांना माहिती नाही की २३ जीआर पैकी एकाही जीआरची अंमलबजावणी केलेली नाही या सर्वाचा निषेध करतो असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी भावा भावामध्ये भांडण लावून दस्तलेखक म्हणून भावाचा राजीनामा घेतला आणि आता काकाच्या सांगण्यावरुन सामनाच्या अग्रलेखामध्ये अविनाश भोसले हे किती अजित पवारांच्या जवळचे आहेत हे सांगतोय आणि पुण्याच्या मागे फटाके लावतोय. असा हुजऱ्या न कधी जन्माला आा आणि ना कधी जन्माला येईल अशा खोचक शब्दांत आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.