घरमहाराष्ट्रपुणेGopichand Padalkar : इंदापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक; मराठा समाज आक्रमक

Gopichand Padalkar : इंदापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक; मराठा समाज आक्रमक

Subscribe

पुणे : ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पुण्यातील इंदापुरात आज (9 डिसेंबर) ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी इंदापूर दौऱ्यावर असलेले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभा संपल्यानंतर शेजारीच दुधाला दरवाढ मिळण्यासाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणास्थळी भेट घेण्याासाठी पोहोचले. मात्र यावेळी मराठा बांधवांनी त्यांनी जोरदार विरोध करताना घोषणाबाजी केली आणि त्यांच्या दिशेने चप्पल फेकली. (Throwing slippers on MLA Gopichand Padalkar in Indapur Maratha society aggressive)

सरसकट मराठा आरक्षणाला विरोधी करण्यासाठी आज इंदापुरात महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर, रासप नेते महादेव जानकर, बबनराव तायवाडे यांच्यासह राज्यभरातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. सभा संपल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेजारीच दुधाला दरवाढ मिळण्यासाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला भेट देण्याचा निर्णय घेतला. या उपोषण स्थळाच्या शेजारीच 47 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – OBC Reservation : आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांनी दिली ओबीसी बांधवांना शपथ

गोपीचंद पडळकर दुधाला दरवाढ मिळण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी जात असताना मराठा बांधवांनी त्यांना विरोध करताना जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मराठा बांधवांनी गोपीचंद पडळकर गो बॅक अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. हे सर्व सुरू असतानाच मराठा बांधवांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर अंगावर चप्पल फेकण्यात आली.  ला फेकल्याचा देखील प्रकार घडला आहे.

- Advertisement -

सदर प्रकारानंतर गोपीचंद पडळकर घटनास्थळावरून निघून गेले.  मात्र मराठा बांधवांनी चप्पलफेक केल्याचा आरोप फेटाळला आहे. तसेच चप्पलफेक करणारे लोक पडळकर यांचेच होते, असा आरोप मराठा बांधवांनी केला आहे. याप्रकरणी आता मराठा बांधवांकडून गोपीचंद पडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा – Gopichand Padalkar : राज्य सरकार कंपाऊंडर तर डॉ. आंबेडकर…; आरक्षणाच्या मुद्द्यावर पडळकर काय म्हणाले?

मराठा आरक्षणावर पडळकर काय म्हणाले?

ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, ओबीसीच्या हिताच्या आड कोणी येत असेल तर त्याला आडवा करायची तयारी ठेवली पाहिजे. आज सरसकट कुणबी दाखले देणे सुरू केले आहे. अनेक जातीच्या लोकांनी हेलपाटे घातले तरी त्यांच्याकडे पुरावे मागितले जात आहेत, असा आरोप करताना छगन भुजबळ यांच्या डोक्याचा केस कोणी वाकडा करु शकत नाही, असं शब्दात गोपीचंद पडळकरांनी हल्लाबोल केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -