एसटी कर्मचारी अस्वस्थ, आश्वासनं पूर्ण करा, गोपीचंद पडळकरांचे अनिल परबांना पत्र

Gopichand Padalkar's letter to Anil Parab demand complete your promise
एसटी कर्मचारी अस्वस्थ, आश्वासनं पूर्ण करा, गोपीचंद पडळकरांचे अनिल परबांना पत्र

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. यामध्ये एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. परंतु विलिनीकरणाची मागणी सोडून इतर मागण्या पूर्ण करण्याची आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. त्या आश्वासनांची पूर्तता करा अशी मागणी भाजप नेते आणि विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राज्य परिवहन कर्मचारी यांचे आंदोलन मिटण्यासाठी आपण आमच्या शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेची व गोपनीय आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पडळकरांनी स्मरण पत्र लिहिले आहे.

भाजप नेते आणि विधान परिषदचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी परिवह मंत्री अनिल परब यांना पत्र लिहिले आहे. पडळकरांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, २८ ऑक्टोबर २०२१ पासून राज्य परिवहनं सेवेतील लाखों कर्मचारी आपल्या कायदेशीर हक्कासाठी आंदोलनात गेले,अख्ख्या महाराष्ट्राची रक्तवाहिनी ठप्प झाली व महाराष्ट्राच्या सुमारे साडेबारा कोटी जनतेची, विद्यार्थ्यांची गैरसोय सुरू झाली. महाराष्ट्रातील जनतेचे हाल होऊ नये या हेतूने आमदार सदाभाऊ खोत व मी स्वत: आपणांशी कर्मचारी प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेनंतर आम्ही आंदोलन थांबवले व त्यानंतर हळूहळू वाहतूक सुरू व्हायला सुरुवात झाली.

त्यानंतर, आम्ही व आपण विधान परिषदेचे सभापती यांनी आदेश दिल्याप्रमाणे द्विपक्षीय तोडगा काढण्यासाठी गोपनीय चर्चा केली. कर्मचारी प्रतिनिधी यांनी कायदेशीर मुद्दे दिले. त्यातील विलीनीकरण हा मुद्दा न्यायनिर्णयावर सोडून इतर सर्व मुद्दे यावर एकमत होऊन सदर चर्चेचा अहवाल विधान परिषदेचे सभापती महोदय यांचेकडे गोपनीयरित्या दिला होता. आपणास मी स्मरण करू इच्छितो की आपण द्विपक्षीय जो तोडगा काढला आहे त्याची तातडीने अंप्रलबजावणी करनेत यावी, कारण कर्मचाऱ्यांमध्ये आजही असंतोष आहे. तसेच मॅक्सी कॅन बाबत काही ब्रिचार होत असल्याचे समजले, असे असेल तर ते जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. तरी ‘त्यापसून’ही परावृत्त व्हावे. गेले काही वर्ष त्यांच्यावर झालेले बेकायदेशीर अत्याचार पाहता आपण द्विपक्षीय तोडण्याची अंमलबजावणी करावी अशी विनंती असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी पत्रात लिहिले आहे.


हेही वाचा : संभाजीराजेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला, पण…, संजय राऊतांची प्रतिक्रिया