केतकी चितळेच्या वक्तव्याचे समर्थन नाही, पण… – गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar's reaction on Ketki Chitale case
Gopichand Padalkar's reaction on Ketki Chitale case

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेवर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अभिनेत्री केतकी चितळेच्या वक्तव्याचे समर्थन नाही, मात्र, तिला दिलेल्या वागणुकीचा निषेध असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.

अभिनेत्री केतकी चितळेची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज ठाणे कोर्टाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिने जामिनासाठी अर्ज केला असून थोड्याच वेळात त्यावर सुनावणी होणार आहे. यावेळी पवारांनी संस्कार आणि संस्कृती शिकवण्याची गरज नाही. त्यांचे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्र शिकला तर माती होईल, अशी टीकाही पडळकरांनी केली आहे. गोपीचंद पडळकर आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता ते माध्यमांशी बोलत होते.

ओबीसी आरक्षमाच्या मुद्यावर टीका –

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही कोर्टाला पुढे करता. पण पदोन्नतीचे आरक्षण पवार घराण्याने घालवले. मंत्री विजय वडेट्टीवार परदेशात आहेत. ओबीसींबाबत त्यांचे प्रेम हे पुतना मावशीचे प्रेम आहे. औरंगाबादेतील औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या संरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, असे आव्हान पडळकरांनी दिले आहे.