घरमहाराष्ट्रशासन आपल्या दारी : अजित पवारांच्या भाषणात गोंधळ; नेमकं काय झालं?

शासन आपल्या दारी : अजित पवारांच्या भाषणात गोंधळ; नेमकं काय झालं?

Subscribe

भंडारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात भाषण करत असताना गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमात आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवार बोलत असताना एका व्यक्तीने हातात बॅनर लावून घोषणा देत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, अशी घोषणा देत एका व्यक्तीने हातातले बॅनर फडकावले.पण त्या व्यक्तीला पोलिसांनी कार्यक्रम स्थळावरुन ताब्यात घेत बाहेर नेहण्यात आले.

अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले पाहिजे. इतर समाजाला यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, असे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे. पण राज्यात काही लोक वेगळ्या वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा आरोप अजित पवार यांनी भंडाऱ्यातील ‘शासन आपल्या दारी कार्यक्रमात’ केला. डेंग्यूतून बरे झाल्यानंतर अजित पवारांचा हा पहिला शासकीय कार्यक्रम आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘शासन आपल्या दारी ही ‘महानौटंकी’, कार्यक्रमाचे कंत्राट ठाण्यातील एका व्यक्तीलाच का?’

शासन आपल्या दारी कार्यक्रमसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, ” जनतेच्या दारापर्यंत सरकारी योजना पोहोचण्यासाठी महायुती सरकारने ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही दिव्यांग, महिला बचत गट आणि ट्रॅक्टर देण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार काम करत असताना तो लोकाभिमुख झाले पाहिजे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला वाटले पाहिजे की, सरकार माझा विचार कत आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेृत्वात महायुतीचे सरकार काम करत आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच…, चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘त्या’ फोटोबद्दल खुलासा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांना दिलासा

अजित पवार पुढे म्हणाले, “प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून आतापर्यंत 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांना दिलासा दिला असून दर आठवड्याला मुख्यमंत्री याचा आढाव घेत असतात. राज्य सरकार ही 1 हजार 954 कोटी रुपयांचे वापट राज्यात विविध भागात करत आहे. यातील 965 कोटी रुपयांची मदत ही यापूर्वीच शेतकऱ्यांना देण्यात आली होती आणि उर्वरित एक हजार कोटी काम सुरू आहे”, असे अजित पवार भाषणदरम्यान म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -