घरदेश-विदेशशिंदेंमुळे नाही, ठाकरेंनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळलं; हरिश साळवेंचा जोरदार युक्तिवाद

शिंदेंमुळे नाही, ठाकरेंनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळलं; हरिश साळवेंचा जोरदार युक्तिवाद

Subscribe

Maharashtra Political Crises in SC | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर १४ फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी घेण्यात येणार आहे. काल ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर आज शिंदे गटाकडून हरिश साळवे युक्तीवाद करत आहेत.

Maharashtra Political Crises in SC | नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालायत (Supreme Court) सुनावणी सुरू असून शिंदे गटाचे वकील हरिश साळवे जोरदार युक्तीवाद करत आहेत. ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी मांडलेले सर्व मुद्दे खोडून काढत सरकार कोसळण्यामागे उद्धव ठाकरेच कारणीभूत आहेत यावर हरिश साळवेंनी आजच्या युक्तीवादात जोर दिला.

हेही वाचा – मंत्रालयात बोगस नोकऱ्यांचा सुळसुळाट, धनंजय मुंडेंच्या नावाखाली तरुणाची सात लाखांची फसवणूक

- Advertisement -

२१ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी सुरतला जात महाविकास आघाडी सरकारमधील पाठिंबा काढून घेत आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने त्यांना बहुमताच्या चाचणीची परीक्षा द्यावी लागणार होती. ३० जूनपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश राज्यपालांकडून देण्यात आल्यानंतर अल्पमतात आलेल्या ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. कारण, शिवसेनेतील जवळपास ३५ आमदार आणि अपक्ष आमदार शिंदे गटात सामील झाले होते. त्यामुळे बहुमत चाचणी घेण्याआधीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले.

बहुमत सिद्ध करण्याकरता चाचणीला सामोरे न जाता त्यांनी राजीनामा का दिला? असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे सरकार कोसळलं नाही तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळले असल्याचा युक्तीवाद हरिश साळवे यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केला.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंना ३० जूनपर्यंत बहुमत सिद्ध करता येऊ शकत होते. परंतु, त्यांनी त्याआधीच पदाचा राजीनामा दिला. बहुमत चाचणी झाली असती तर राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला नसता, असंही हरिश साळवे यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर १४ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी घेण्यात येणार आहे. काल ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर आज शिंदे गटाकडून हरिश साळवे युक्तीवाद करत आहेत. कपिल सिब्बलांनी काल मांडलेल्या अनेक मुद्द्यांना हरिश साळवेंनी खोडून काढत ठाकरे गटाच्याच अडचणी वाढल्या आहेत. आजच्या सुनावणीत पुढे काय होतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा – होय, पत्रकार शशिकांत वारिशेंची हत्या पूर्वनियोजितच; आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -