Eco friendly bappa Competition
घर ठाणे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, मुंबईनंतर ठाण्यातही काळ्या रंगाच्या बॅनरने चर्चेला उधाण

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, मुंबईनंतर ठाण्यातही काळ्या रंगाच्या बॅनरने चर्चेला उधाण

Subscribe

बॅनर कोणी लावले?...

ठाणे : ठाणे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नौपाडा सारख्या परिसर पुन्हा एकदा लावलेल्या त्या काळ्या रंगाचा बॅनरने चर्चेला आलेले आहे. तसेच त्याच्यावर “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” अशा आशयाचा मजकूर असल्याने सध्या सर्वांचेच लक्ष तो बॅनर केंद्रित करत आहे. प्रामुख्याने या एकमेव बॅनरद्वारे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच टार्गेट केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. त्यातच राजकीय चिखलफेक होत असताना, राजकीय हेतुपोटी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे विरोधकांवर गुन्ह्यांची मालिका सुरू होते, की अशी चर्चा यानिमित्ताने रंगताना दिसत आहे.  त्यातच, ठाण्यातील नौपाडा परिसरामध्ये सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? या आशयाचा बॅनर झळकत आहे. तसेच त्या बॅनरवर बारीक अक्षरात, “फक्त मनोरंजनासाठी,अधिक माहितीसाठी येथे पाहत राहा”, असे नमूद केल्याने हा ट्रेलर आहे, चित्रपट अभी बाकी है ..! असे त्या बॅनर लावणाऱ्यांना म्हणायचं असेल असे वाटते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि सरकार आता याकडे कशाप्रकारे गांभीर्याने पाहतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर या बॅनरचा बोलता धनी कोण हे अद्यापही समोर आले नसल्याने आणि माहितीसाठी येथे पाहत राहा असा उल्लेख आल्याने या पुढच्या बॅनरवर नेमके काय असेल याकडेही राजकीय मंडळीची नजर लागून राहिली आहे.

ठाण्यासह मुंबईतही अशा प्रकारचा बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनरवर सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. हे विधान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे असून, केसरी या त्यांच्या वर्तमानपत्रात त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखाची ही हेडलाईन होती. टिळकांचे अग्रलेख हाच ‘केसरी’चा आत्मा असायचा. टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता. आता तोच धागा पकडून मुंबईत हे बॅनर झळकावण्यात आले आहेत.


- Advertisement -

हेही वाचा : ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’; मुंबईत लागलेल्या होर्डिंग्सची


 

- Advertisment -