Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यातील सरकार घटनाबाह्य नाही, उज्ज्वल निकमांनी तारखांसहीत दिलं स्पष्टीकरण

राज्यातील सरकार घटनाबाह्य नाही, उज्ज्वल निकमांनी तारखांसहीत दिलं स्पष्टीकरण

Subscribe

हे नवे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. मात्र, हे घटनाबाह्य सरकरा आहे, असं मला वाटत नाही, असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं. ते एका कार्यक्रमात बोलत होते. राजकीय स्थित्यंतराची संपूर्ण पार्श्वभूमी सांगत त्यांनी हे विधान केलं आहे.

मुंबई – एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळलं. शिंदेंनी फडणवीस यांच्यासोबत युती करून नव्याने सत्ता स्थापन केली. मात्र, हे नवे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. मात्र, हे घटनाबाह्य सरकरा आहे, असं मला वाटत नाही, असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Senior Lawyer Ujjwal Nikam) यांनी म्हटलं. ते एका कार्यक्रमात बोलत होते. राजकीय स्थित्यंतराची संपूर्ण पार्श्वभूमी सांगत त्यांनी हे विधान केलं आहे.

हेही वाचा – महाजनांना पक्षवाढीसाठी पहाटे 4 पर्यंत जागावे लागत नव्हते; पूनम महाजनांचा टोला

- Advertisement -

उज्ज्वल निकम म्हणाले की, “राजकीय आरोप करणं हे सहाजिक आहे. मी आधीही सांगितलं होतं की प्रेमात आणि युद्ध सर्व काही माफ असतं. त्याच आधारे मी म्हणेन की प्रेमात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं. मी प्रेम शब्द काढतो. कारण राजकारणात प्रेम कधीच नसतं. केवळ सत्ता काबीज करण्याचा हेतू असतो. मग ती तुम्ही कोणत्या मार्गाने काबीज करता हे महत्त्वाचं नसतं. त्याला कायद्याचा मुलामा विधिज्ज्ञ देत असतात. राजकीय आरोप म्हणून हे सरकार घटनाबाह्य म्हणू शकता. मात्र हा हुशारीने टाकलेला डाव आहे.

हेही वाचा – ठाकरे-शिंदे संघर्ष पुन्हा वाढणार? सिल्लोडमध्ये सत्तार अन् आदित्य ठाकरे शक्तिप्रदर्शन करणार

- Advertisement -

“मागेही मी तुम्हाला तारखा सांगितल्या होत्या. २८ जूनला शिंदे गटाची याचिका दाखल होते. त्यांना दिलासा मिळतो ११ जुलैला. २९ जूनला राज्यपालांकडे प्रतिनिधी जातात. मात्र त्यामध्ये शिंदे गटाचा एकही आमदार नसतो. २९ जूननंतर राज्यपालांचं समाधान होतं. ते प्रस्तुत सरकारला सांगतात की बहुमत सिद्ध करा. ३० जूनला एकच विषय असतो अंजेड्यावर की आजच बहुमत सिद्ध करा. ३० जूनच्या आत उद्धवजी राजीनामा देतात. सरकार गडगडतं. या सगळ्या घटना तुम्ही पाहिल्या की या फार हुशारीने खेळल्या गेल्या आहेत,” असं निकम यांनी म्हटलं आहे.

“सगळा घटनाक्रम क्रोनोलॉजिकली पाहिला तर कायदाचा विद्यार्थी म्हणून मला हे घटनाबाह्य सरकार आहे असं म्हणता येणार नाही. राजकीय आरोप म्हणाल तर शिंदे गटाचीही बाजू घ्यायची नाही आणि ठाकरे गटाचीही बाजू घ्यायची नाही,” असंही उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – मला मुंबईच्या सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा, अमृता फडणवीसांनी नाकारली सुरक्षा

- Advertisment -