घरमहाराष्ट्र'सरकार हे धोकादायक विषाणू; यावर जनतेची 'लस' परिणामकारक'; अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र

‘सरकार हे धोकादायक विषाणू; यावर जनतेची ‘लस’ परिणामकारक’; अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र

Subscribe

'सरकार हे धोकादायक विषाणू आहे. मानवी जीवन सुरळीत आणि सुरक्षित करणारी शासन व्यवस्था, राज्यघटना, धार्मिक व सामाजिक सलोखा, लोकशाही धोक्यात आणणारेदेखील आहेत. त्यामुळे या घातक विषाणूंसाठी प्रतिबंधक लसीची मात्रा प्रभावी ठरते आणि यावर जनतेची 'लस' परिणामकारक' असल्याचं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार यावर जनतेची लसचं परिणामकारक असल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

‘सरकार हे धोकादायक विषाणू आहे. मानवी जीवन सुरळीत आणि सुरक्षित करणारी शासन व्यवस्था, राज्यघटना, धार्मिक व सामाजिक सलोखा, लोकशाही धोक्यात आणणारेदेखील आहेत. त्यामुळे या घातक विषाणूंसाठी प्रतिबंधक लसीची मात्रा प्रभावी ठरते आणि यावर जनतेची ‘लस’ परिणामकारक’ असल्याचं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार यावर जनतेची लसचं परिणामकारक असल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. ( Government is a dangerous virus The public s vaccine is effective Criticism of the government from the Samana Editorial )

मागील दीड- दोन दशकांपासून स्वाईन-फ्लू, चिकनगुनिया, सार्स, मर्स, बर्ड फ्लू, झिका, इबोला, मारबर्ग, निपाह, कोरोना, ओमायक्राॅन आणि त्याचे नवनवीन उपप्रकार अशा विविध विषाणूंच्या तडाख्यात जग सापडलं आहे. सर्वत्रच विषाणूंचे राज्य दिसत आहे. मानवी आरोग्यासाठी धोकादायक विषाणू जसे आहेत तसे मानवी जीवन सुरळीत आणि सुरक्षित करणारी शासन व्यवस्था, राज्यघटना, धार्मिक व सामाजिक सलोखा, लोकशाही धोक्यात आणणारेदेखील आहेत. मानवी आरोग्यासाठी घातक विषाणूंसाठी प्रतिबंधक लसीची मात्रा प्रभावी ठरते तर लोकशाहीसाठी धोकादायक ठरणाऱ्या विषाणूंवर जनतेची मात्रा परिणामकारक ठरते, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

सामनाच्या अग्रलेखाची महाराष्ट्र दखल घेत नाही

सामनातून लिहिल्यामुळे फार राजकीय परिणाम होतो असं नाही, सामनाच्या अग्रलेखाची दखल महाराष्ट्र घेत नाही, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका झाल्या. त्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अनुक्रमे 1, 2 आणि 3 नंबरला होते. ठाकरे गटाचा नंबर सर्वात शेवटी होता. त्यामुळे सामनाच्या अग्रलेखाचा परिणाम काय होतो? हे निवडणुकीत समजलंच आहे. विषाणू कोण? हे जनता दाखवत आहे, असंही सामंत यावेळी म्हणाले. कृषी उत्पादकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप कधीही नव्हतं तिथेही 43 टक्के जागा आमच्या आहेत. त्यामुळे त्यांनी सामनातून लिहित राहावं. महाराष्ट्र त्याची दखल घेत नाही आणि सामनातून लिहिल्यामुळे फार राजकीय परिणाम होतो असंही नाही, असं सामंत म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: कोरोना विषाणू कोण? हे जनता दाखवतेयं; ‘सामना’तील टीकेचा उदय सामंतांनी घेतला समाचार )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -