दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी, भरती सुरू

government jobs sarkari naukri 2022 bel recruitment invited 2022 application for posts of trainee engineer on

सरकारी नोकरी मिळण्यासाठी अनेक विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करत असतात. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांचं लक्ष हे सरकारी नोकरीवर लागलेलं असतं. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची मोठी संधी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३ हजार २६ रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

संपूर्ण भारतात अधिकृत सुचनेनुसार पोस्ट ऑफिसच्या ३८ हजार ९२६ रिक्त पदांची भरती केली जात आहे. तर यामध्ये महाराष्ट्रातील ३ हजार २६ जागा रिक्त आहेत. पोस्टामधील भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्ष निश्चित करण्यात आले आहे.

काय आहेत नियम व अटी?

पदाचे नाव ग्रामीण डाक सेवक असं आहे. तसेच या सरकारी नोकरीची पदाची संख्या ३ हजार २६ जागा आहेत.
यासाठी शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण लागणार आहे. तसेच नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात आहे. अर्ज शुल्कासाठी १०० रूपये भरणे आवश्यक आहेत. अर्ज सुरू होण्याची तारीख २ मे २०२२ असं असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जून २०२२ अशी आहे. त्याचप्रमाणे नोकरीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता.


हेही वाचा : भोंगे उतरेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार-राज ठाकरे