घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात ‘पापुआ न्यू गिनी’ छाप सरकार... ठाकरे गटाचा केंद्रासह शिंदे गटावर निशाणा

महाराष्ट्रात ‘पापुआ न्यू गिनी’ छाप सरकार… ठाकरे गटाचा केंद्रासह शिंदे गटावर निशाणा

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे जपानच्या हिरोशिमा येथे ‘क्वॉड’ परिषदेसाठी (Quad Summit) पोहोचले आहेत. त्या ‘क्वॉड’ परिषदेत त्यांनी संकेत दिले की, ‘‘चीनच्या (China) मुसक्या आवळणार!’’ मोदी सरकारने महाराष्ट्रातही लोकशाही व संविधानाच्या मुसक्या बांधून एक ‘पापुआ न्यू गिनी’ (Papua New Guinea) छाप सरकार सत्तेवर बसवले व तेसुद्धा दिल्लीश्वरांचे सदैव चरणस्पर्श करीत असते, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – ₹ 2000 Note : 30 सप्टेंबर 2023पर्यंतच 2000 रुपयांची नोट राहणार वैध! – आरबीआय

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार बेकायदेशीर ठरवूनही विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात, ‘‘मला जो घ्यायचा तो निर्णय घेईन.’’ म्हणजे जे दिल्लीत तेच महाराष्ट्रात. उद्या दारुण पराभव झालेल्या कर्नाटकातही तोच खेळ सुरू होईल, असा निशाणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena UBT) मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखातून साधला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ‘क्वॉड’ परिषदेत ‘‘चीनच्या मुसक्या आवळणार!’’ असे संकेत दिले. पण चीनच्या मुसक्या आवळणार, असा दम त्यांनी दिल्लीतून कधीच दिल्याचे कुणाला स्मरत नाही. चीनच्या मुसक्या आवळाल तेव्हा आवळाल, पण देशात लोकशाही, संविधानाच्या मुसक्या मोदी राज्यात आवळल्या जात आहेत. लोकशाहीच्या मुसक्या बांधून, त्याचे गाठोडे करून संसदेच्या कोपऱ्यात अडगळीत ठेवून दिले, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिकच्या नोटप्रेसमध्ये 500च्या जवळपास 2 हजार 800 मिलियन नोटांची होणार छपाई

देशात ‘हम करे सो कायदा’ सुरू आहे. जेथे भाजपशासित सरकारे नाहीत त्या सरकारांना काम करू द्यायचे नाही, राज्यपालांच्या माध्यमातून लोकशाही व संविधानाच्या मुसक्या बांधायच्या असे एकंदरीत राष्ट्रीय धोरण दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वगुरू आहेत. ‘पापुआ’ देशाचे पंतप्रधान त्यांच्या पाया पडतात, पण मोदींच्या देशात लोकशाहीच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्याचे काय? पापुआच्या पंतप्रधानांनी त्यांना चरणस्पर्श केला. खरं तर त्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवे होते, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -