घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात हॅलोऐवजी आता वंदे मातरम, राज्य सरकारचा जीआर

महाराष्ट्रात हॅलोऐवजी आता वंदे मातरम, राज्य सरकारचा जीआर

Subscribe

शासकीय कार्यालयांमध्ये हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणण्यात यावं, असं आवाहन भाजप नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी केलं होतं. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतर वाद देखील निर्माण झाला होता. परंतु या वादानंतरही शासनाकडून हॅलोऐवजी वंदे मातरमचं अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो नव्हे- वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ वर्धा येथून होत आहे. यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात साजरा होत आहे. याचे औचित्य साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनी तसेच मोबाईलवर पाहुण्यांशी किंवा सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत संभाषणाची सुरुवात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ने होणार आहे, असं सरकारी अध्यादेशात म्हटलं आहे.

- Advertisement -

आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी जय हिंद तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते. वास्तविक पाहता दोन व्यक्ती एकमेकांना सुरुवातीस संबोधित करताना वेगवेगळी अभिवादने वापरताना आढळून येतात. महाराष्ट्रात नमस्कार सारखे संबोधनात्मक शब्द आजही मोठया प्रमाणात वापरण्यात येतात. त्याशिवाय हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सारखे शब्दही दिसून येतात. वेगवेगळे समूह, समुदाय, धर्म यांमध्येही अभिवादन करण्याच्या विविध प्रथा आहेत. वैयक्तिकच सार्वजनिक जीवनात या प्रथा सर्वजण आपापल्या परीने जोपासत आहेत व त्या जोपासण्याचा त्यांना अधिकारही आहे.

वंदे मातरमचा वाद वाढल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. इंग्रजांकडून किंवा परदेशातून आलेल्या हॅलो शब्दाऐवजी वंदे मातरम् शब्द वापरावा, असं अभियान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या विभागाने सुरू केलं आहे, असं मुनगंटीवार म्हणाले होते.


हेही वाचा : शिंदे गटाकडून गर्दी जमवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या आवाजाचा वापर, दसरा मेळाव्याच्या टीझरवरून हल्लाबोल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -