अतिवृष्टीग्रस्तांना सरकारने मदत करावी; नाना पटोलेंची विधानसभेत मागणी

राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून नदी नाल्यांना पूर आला आहे. पूरामुळे सर्व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

congress leader nana patole slams Rashtriya Swayamsevak Sangh and bjp

राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून नदी नाल्यांना पूर आला आहे. पूरामुळे सर्व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्तांना सरकारने मदत करावी अशा मागणी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे केली. (Government should help flood victims Nana Patole demand in the assembly)

“नागपूर जिल्हा पाण्याखाली आहे. हा उपमुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या राज्याचा अन्नदात अडचणीत आला आहे. सरकारला याबाबत जाणीव करून द्यावे”, अशी मागणी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केली.

नाना पटोले यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले असून, राज्यातील सर्व परिस्थितीवर सरकारचे लक्ष असल्याचे त्यांनी म्हटले. “सगळ्या परिस्थितीवर सरकार नजर ठेवून आहे. मुख्यमंत्र्यांनी दौरेही केले आहेत. राज्यातील सर्व परिस्थितीवर सरकारचे लक्ष”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

भंडारा जिल्हातील पुरपरीस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला सुट्टीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, आज भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळा, शिकवनी वर्ग, आंगणवाडीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.