घरमहाराष्ट्रपंढरपूरमध्ये वृक्ष लागवड योजनेखाली सरकारची फसवणूक; अधिकारी निलंबित

पंढरपूरमध्ये वृक्ष लागवड योजनेखाली सरकारची फसवणूक; अधिकारी निलंबित

Subscribe

मुंबई- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे वृक्षलागवड योजनेच्या नावाखाली राज्य सरकारची फसवणूक प्रकरणी अधिकाऱ्याला निलंबित केल्याची घोषणा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी परिषदेत केली. विधान परिषद सदस्य किशोर दराडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडली होती.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये 2017 ते 2019 कालावधी 30 हजार कोटी वृक्ष लागवड योजना राबवण्यात आली, या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील वनक्षेत्रपालने अपहार करून कोट्यवधी रुपयांची अपरातफर केली. अपंगाच्या नावाने देखील चेक काढण्यात आले, असा आरोप सदस्य दराडे यांनी करताना पुरावे सादर केले. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी दराडे यांनी केली.

- Advertisement -

शिवसेनेच्या सदस्या मनीषा कायंदे, या मुद्द्याला आणि मागणीला पाठिंबा दिला. 33 कोटी वृक्ष लागवड योजनेवर कायदे यांनी आक्षेप घेतला. एका जिल्ह्यात असा प्रकार असेल तर राज्यभरात काय स्थिती असेल, त्यामुळे सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी लावून धरली. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मधील वृक्षलागवड योजनेबाबत अफरातफर झाली आहे. त्यामुळे संबंधित वनक्षेत्रपाल अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

तसेच राज्यभरातील 33 हजार कोटी वृक्ष लागवड योजनेच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. समितीच्या दोन बैठका झाल्या असून लवकरच अहवाल सादर करून त्यातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे भरणे म्हणाले.


बापरे! अफगाणिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांवर चक्क टॅक्सी चालवण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -