पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ, आजपासून लिटरमागे ३ रूपये वाढले

Petrol Diesel Price hike in 35 paisa
Petrol Diesel Price: विकेंडला फिरायला जाताय? तर आधी जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आजपासून जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने उभे राहिलेले संकट पाहता त्यामधून सावरण्यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या निर्णयानुसार आता उत्पादन शुल्कापोटी अतिरिक्त असे ३ रूपयांची अतिरिक्त वसुली पेट्रोल आणि डिझेलमागे करण्यात येणार आहे. आजपासूनची ही उत्पादन शुल्कवाढ अंमलात येणार आहे.

या निर्णयामुळे केंद्र सरकारला अतिरिक्त महसूल वाढीसाठी मदत होणार आहे. करोना व्हायरसचे संकट तसेच मंदावलेली अर्थव्यवस्था असा परिस्थितीत या महसूलातून केंद्र सरकारला आणखी मदत मिळेल असे अपेक्षित आहे. उत्पादन शुल्कातील वाढीमुळे सरासरी २ हजार कोटी रूपयांचा अतिरिक्त महसूल केंद्र सरकारला मिळेल असे अपेक्षित आहे. त्यामुळे आता इंधन पुरवठादार कंपन्या हा अतिरिक्त शुल्क स्वतः सहन करणार की ग्राहकावर लादणार याबाबतचा निर्णय आता कंपन्यांवर अवलंबून आहे.

उत्पादन शुल्काची वसुली ही विशेष असणार आहे. त्यामध्ये पेट्रोलसाठी २ रूपयांपासून ते ८ रूपये प्रति लिटर अशी वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलसाठी सरासरी ४ रूपयांपर्यंतची ही वाढ असेल. तसेच पेट्रोलवर सेसच्या स्वरूपातील आकारणी ही १ रूपये प्रति लिटर अशी पेट्रोलसाठी असेल. तर डिझेलसाठी १० रूपये अशी असणार आहे. केंद्र सरकारकडून याबाबतचे एक परिपत्रक जारी झाले आहे.