घरमहाराष्ट्रकोरोना मृतांच्या नातेवाईकांना दोनदा मिळालेली अतिरिक्त मदत वसूल करण्याचे सरकारचे आदेश

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना दोनदा मिळालेली अतिरिक्त मदत वसूल करण्याचे सरकारचे आदेश

Subscribe

कोरोनाच्या काळात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत म्हणजेच सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यानुसार, 50 हजार रुपये देण्यात आले होते. मात्र, त्यावेळी कांही तांत्रिक बाबीमुळे प्रस्ताव पाठवताना अधिक वेळा व जवळच्या नातेवाईकांना पाठवले, अशी राज्यात दुहेरी अनुदान वाटपाची 2 हजार 53 प्रकरणे घडल्याची माहिती समोर आले आहे.

कोरोनाच्या काळात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत म्हणजेच सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यानुसार, 50 हजार रुपये देण्यात आले होते. मात्र, त्यावेळी कांही तांत्रिक बाबीमुळे प्रस्ताव पाठवताना अधिक वेळा व जवळच्या नातेवाईकांना पाठवले, अशी राज्यात दुहेरी अनुदान वाटपाची 2 हजार 53 प्रकरणे घडल्याची माहिती समोर आले आहे. त्यामुळे आता 2053 कुटुंबाकडून 11 कोटी रूपयांची रक्कम वसुल करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 2053 जणांच्या बँक खात्यावर जवळपास 10 कोटी 26 लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम जमा झाली आहे. आता ही अनुदानरुपी मदत वसूल करण्याची सूचना राज्याचे उपसचिव संजय धारुरकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच, ही रक्कम सरकारला पुन्हा परत न केल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, उस्मानाबादच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाने नातेवाईकांच्या बँक खात्यामध्ये अधिक वेळा अनुदानाची रक्कम प्राप्त झाली आहे, अशा नातेवाईकांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून रक्कम शासनाच्या खात्यावर जमा करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.

दोन वेळा अनुदानाची रक्कम गेलेल्या अर्जदारांची यादी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. ज्या अर्जदारांच्या खात्यात सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा केली आहे. तसेच संबंधिताकडून ही रक्कम वसूल करण्याच्या सूचनाही उपसचिव धारुरकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना दिली आहे. याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागास देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबादेवी परिसरात बॅनर लावण्यावरून मनसे कार्यकर्त्यांची महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -