घर महाराष्ट्र 'फेसबुकवर नाही तर हे फेस टू फेस बोलणारं सरकार'; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना...

‘फेसबुकवर नाही तर हे फेस टू फेस बोलणारं सरकार’; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

फेसबुकवर बोलणार हे सरकार नाही, तर हे सरकार फेस टू फेस बोलणार आहे. बंद दाराआड बसणारं सरकार आता नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मिशन मोडवर सरकार काम करत आहे. 36 जिल्ह्यांतही कार्यक्रम होणार आहेत. जनतेपर्यंत जाणारं हे सरकार आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी योजना तसंच, चांगल्या कार्यक्रमांमुळे काहींच्या पोटात मळमळ होतं आहे. फेसबुकवर बोलणारं हे सरकार नाही, तर हे सरकार फेस टू फेस बोलणारं आहे. बंद दाराआड बसणारं सरकार आता नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शिर्डीतील काकडी गावात आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. ( Government will talk face to face not on Facebook Devendra Fadnavis taunts Uddhav Thackeray )

फडणवीस म्हणाले की, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कार्यक्रमापुरता मर्यादित नाही. वर्षांचे 365 दिवस हे सरकार जनतेच्या दारी जात राहणार आहे. हे लोकांपर्यंत जाणारं सरकार आहे. कारण हे बंद दाराआड काम करणारं सरकार नाही तर हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे. हे फेसबुकवर बोलणारं सरकार नाही, असा अप्रत्यक्ष टोला फडणवीसांना ठाकरेंना लगावला आहे.

- Advertisement -

आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आहोत. पुढे ही पोहचत राहणार आहोत. निश्चितपणे जनतेच्या जीवनात परिवर्तन करणारं हे सरकार आहे. नवीन सरकारने आणलेल्या योजना अनेकांपर्यंत पोहचत आहेत, असंही पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

1 रुपयात सुरू केलेली पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. राज्यात सध्या पावसानं ब्रेक घेतला आहे, मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो अशी परिस्थिती येऊ नये पण दुर्दैवानं दुष्काळाची परिस्थिती आलीच तर पीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असंही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: ‘स्वत: चा प्रचार करण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम’; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा )

सुप्रिया सुळेंचा शासन आपल्या दारी कार्यक्रमावर निशाणा

शासन आपल्या दारी हा आपला कार्यक्रम त्या व्यासपीठावरील नेत्यांना प्रमोट करण्यासाठी केला जात आहे. गरीब मायबाप जनतेच्या पैशावर नवीन जुमला या सरकारने बांधला आहे. करदात्यांचे पैसे जाहीरातींवर खर्च केले जातात, कार्यक्रमासाठी करोडो रुपयांचा चुराडा करण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या आधारे शासन तुमच्या दारी द्या, ग्रामपंचायतीला द्या असं सुळे यावेळी म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जयंत पाटील मंत्री असताना त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला वायफाय देऊन त्यांच्या दारापर्यंत, घरापर्यंत पोहचण्याचं काम केलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर न करुन स्वत:चं प्रमोशन करण्यासाठी हा कार्यक्रम घेत केविलवाणा प्रयोग केला जात आहे. त्याचसोबत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम स्वत:चा प्रचार करण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवला जात असल्याची टीका करत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

- Advertisment -