घरताज्या घडामोडी'ठाकरे' सरकार विश्वासघाती सरकार

‘ठाकरे’ सरकार विश्वासघाती सरकार

Subscribe

'ठाकरे' सरकार हे विश्वासघाती सरकार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‘यंदाचे हिवाळी अधिवेशन केवळ घोषणाबाजीचे अधिवेशन होते. या सरकारने अधिवेशनात निवळ घोषणाबाजी करत अधिवेशन संपवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, आज कर्जमाफीची सर्वाधिक गरजही अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना असताना त्यांना ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारने अवकाळीग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली असून ठाकरे सरकार हे विश्वासघाती सरकार आहे’, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच अवकाळीग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला आहे. आज सकाळी कोल्हापुरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

काय म्हणाले फडणवीस

‘राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे ९४ लाख हेक्टरवरचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे अशा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे परत करण्याची त्यांची क्षमताच राहिलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीची सध्या सर्वाधिक गरज होती. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा या लोकांना होणार नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन हे केवळ औपचारिकता म्हणून पार पडले आहे. तसेच हे विश्वासघाती सरकार असून त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे’ असा घणाघात फडणवीस यांनी सरकारवर केला आहे.

- Advertisement -

तसेच ते पुढे म्हणाले की, ‘कर्जमाफीवरुन सरकारमधील पक्षांनी केलेले हे दुसरे घुमजावे आहे. कारण शेतकरी कर्जमाफी, सातबारा कोरा करु अशा घोषणा सत्तेतील तिन्ही पक्षांनी आपल्या जाहिरनाम्यात दिल्या होत्या. मात्र, हिवाळी अधिवेशनात सरकारने केवळ वेळ मारुन नेली आहे. त्यामुळे सरकारने आपल्या आश्वासनांची पूर्तता करायला हवी. आम्ही लवकरच रस्त्यावर उतरुन अवकाळीग्रस्तांसाठीच्या कर्जमाफीची मागणी सरकारकडे करणार आहोत’.


हेही वाचा – कोकण विकास आघाडीचे ४१वे अधिवेशन मुंबईत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -