घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानच्या सरकारांनी मदत केली, महाराष्ट्र सरकार कांदा उत्पादकांना मदत कधी...

गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानच्या सरकारांनी मदत केली, महाराष्ट्र सरकार कांदा उत्पादकांना मदत कधी करणार?; पवारांचा सवाल

Subscribe

नाशिक : गुजरात तसेच मध्यप्रदेश राज्यात तेथील राज्य सरकारांनी कांद्याचे भाव कोसळल्याने तात्काळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करत दिलासा दिला. मात्र, महाराष्ट्रात अद्यापही कोणतीच ठोस मदत मिळू शकलेली नाही. शेतकऱ्यांनी मदत कधी मिळणार असा सवाल खा. शरद पवार यांनी केला आहे. त्याच सोबत नाफेड अद्यापही बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करत नाहीये. कुठल्यातरी फार्मर प्रोड्यूसर कंपनी तसेच व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे. तीही अत्यंत अल्प प्रमाणात आहे. तिथेही दर खूप कमी आहे. असेही यावेळी पवार म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातील कळवळ तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवार नाशिक मध्ये दाखल झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी कांदा प्रश्नावरून राज्य सरकारवर सडकून टीका करताना काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. राज्य सरकार सांगतय की नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जातोय. मात्र, खरी परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे. नाफेडने स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन कांद्याची खरेदी केली पाहिजे. मात्र, अद्यापही नाफेड तिथपर्यंत पोहचले नाहीये. नाफेड कडून जी कांदा खरेदी सुरू आहे ती काही फार्मर प्रोड्यूसर कंपनी तसेच व्यापाऱ्यांकडून होत आहे. तीही अत्यंत तुटपुंजी आहे. तसेच त्याठिकाणी तरी किमान चांगला भाव देणे अपेक्षित होते. किमान १२०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव थेट शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, नाफेड जिथून खरेदी करते आहे तिथेही ६०० रुपये दराने खरेदी सुरू आहे. पुन्हा ते व्यापारी किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपन्या शेतकाऱ्यांकडून त्याहून कमी किमतीत माल घेणार. यातून साध्य काय होतंय. असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

- Advertisement -
इतरही पिकांचे मोठे नुकसान 

महाराष्ट्रात तसेच विशेषतः उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झाली आहे. त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात कांद्यासह गहू, द्राक्षे, धान्य अश्याही पिकांच मोठ नुकसान झाल आहे. या नुकसानीचे जलद गतीने पंचनामे होऊन त्यांना मदत पोहचली तर येणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसात तो शेतकरी तग धरू शकेल. कारण, हा सर्व जिरायती शेती करणारा शेतकरी आहे. यांचे उत्पन्न मर्यादित असते. त्यात जर असे अस्मानी संकट आले तर त्याची आर्थिक स्थिती अजून अडचणीची होते. त्यामुळे अनुदान, नुकसान भरपाई किंवा नाफेड अशा कुठल्याही स्वरूपात करा. पण, शेकऱ्यांना तात्काळ मदत करा. असे आवाहनही यावेळी शरद पवार यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -