घरताज्या घडामोडीमग महाराष्ट्राला चार्टर विमान का मिळू शकत नाही - मनसे

मग महाराष्ट्राला चार्टर विमान का मिळू शकत नाही – मनसे

Subscribe

'इतर राज्यांना जर चार्टर विमाने मिळू शकतात, तर महाराष्ट्राला का नाही', असा सवाल उपस्थित करत 'महाराष्ट्रात येणाऱ्या वंदे भारतच्या विमानांद्वारे महाराष्ट्रीय लोकांनाच प्राधान्याने महाराष्ट्रात परत आणायला हवे, असे मनसेच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांना सांगितले.

‘इतर राज्यांना जर चार्टर विमाने मिळू शकतात, तर महाराष्ट्राला का नाही’, असा सवाल उपस्थित करत ‘महाराष्ट्रात येणाऱ्या वंदे भारतच्या विमानांद्वारे महाराष्ट्रीय लोकांनाच प्राधान्याने महाराष्ट्रात परत आणायला हवे, असे मनसेच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांना सांगितले. कोरोनामुळे सुमारे २ हजार ५०० निवासी डाॅक्टरांच्या रखडलेल्या (पदव्युत्तर डिग्री आणि डिप्लोमा) परिक्षा, परदेशांत अडकून पडलेले हजारो महाराष्ट्रीय बांधव आणि परप्रांतीय मजुरांची नोंदणी या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी मनसेने अनेक विषय राज्य पालांच्या निदर्शनास आणून दिले.

‘निवासी डाॅक्टर एकीकडे कोरोना रुग्णांसाठी लढत असताना दुसरीकडे त्यांच्यावर परीक्षेची (१५ जुलै) टांगती तलवार आहे. या परीक्षेबाबत विद्यार्थी-डाॅक्टरांनी सुचवलेल्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा’, अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी यावेळी राज्यपालांकडे केली. तसेच परप्रांतातून जे मजूर आता पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत, त्यांची आंतरराज्यीय स्थलांतर कायद्याद्वारे नोंदणी आणि वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना राज्यात घ्यावे, आणि त्यादृष्टीने राज्य सरकारला आपण आदेश द्यावे, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आपण मांडलेले विषय महत्वाचे आहेत. मी त्यात लक्ष घालतो’, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

- Advertisement -

अमित ठाकरेंचे अजित दादानांही पत्र

दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देखील पत्र लिहिले आहे. या पत्रात अमित ठाकरे म्हणाले की, परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त रु. १ हजार ६०० मानधन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशां’ना दर महिन्याला रु. ४ हजार ते १० हजार इतका मोबदला मिळत आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावे, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच इतर राज्यांत आशा स्वयंसेविकांना दर महिन्याला मिळणारा मोबदला महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांपेक्षा जास्त आहे. आपल्या राज्यातील आशा स्वयंसेविकांना इतका कमी मोबदला का मिळत आहे? तसेच महाराष्ट्रात आशा स्वयंसेविकांची अशी स्थिती का, याकडे अमित ठाकरे यांनी लक्ष वेधले.


हेही वाचा – १० महिन्यांच्या बाळासह मनमाडचे ९ रुग्ण कोरोनामुक्त

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -