राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण, रिलायन्स रुग्णालयात केले दाखल

यामुळे शिंदेंना भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी राज्यपाल कोरोनातून बरं होण्याची वाट पाहवी लागणार आहे.

governor bhagat singh koshyari infected with corona

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना उपचारांसाठी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपालांची काल केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार केले जाणार आहे. दरम्यान दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धक्क्यावर धक्के पोहचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न हे शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांकडून सुरु आहेत.

यात एकनाथ शिंदेंनी 40 आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा केल्याने ते स्वतंत्र्य गट स्थापन करण्याची शक्यता आहे. स्वतंत्र गटाच्या अधिकृत मान्यतेसाठी शिंदे आज दुपारी मुंबईत दाखल होत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहिती होती. मात्र राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने शिंदेंना स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार असे बोलले जात आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासाठी गुवाहाटीवरून एका विशेष विमानाची सोय करण्यात आली होती. मात्र आता राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईत आल्यानंतर शिंदे नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी शिंदेंना राज्यपाल कोरोनातून बरं होण्याची वाट पाहवी लागणार आहे.

भाजपसोबतच्या सत्तास्थापनेसाठी आमदारांच्या संख्याबळाचं गणित कस जुळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यात दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणे गरजेचे आहे. यात शिंदेंकडे 37 आमदारांचे संख्याबळ असणं गरजेचं आहे. यावर दरम्यान माझ्यासोबत शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी दोन तृतीयंश आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केल्याने आता त्या गटाला स्वंतत्र्य गट म्हणून अधिकृत दर्जा मिळणार हे निश्चित आहे. यासाठी शिंदे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे पत्र आज राजभवनात देण्याची शक्यता होती. मात्र भगतसिंह कोश्यारींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या भेटीची वेळ पुढे जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी १ वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडी राहणार की कोसळणार यावर चर्चा सविस्तर चर्चा होणार आहे.


माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार, माझाच गट अधिकृत – एकनाथ शिंदे