घरमहाराष्ट्रराज्यपाल राजकारण करत असल्याच्या सरकारच्या आरोपावर कोश्यारींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राज्यपाल राजकारण करत असल्याच्या सरकारच्या आरोपावर कोश्यारींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी असा दौरा करणार आहेत. यावरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नाराजी व्यक्त करत राजकारण करत असल्याची टीका राज्य सरकार करत आहे. दरम्यान, यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.

राज्यपालांनी आज नांदेड विद्यापीठाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी राज्यपालांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्यावरुन राजकारण केलं जात आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी “तुम्ही तर राजकारण करत नाही ना…मग जाऊद्या…” असं म्हणत प्रश्नाला बगल दिली.

- Advertisement -

सरकारच्या आक्षेपानंतरही राज्यपालांचा मराठवाडा दौरा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांचा तीन दिवसांचा दौरा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे. ठाकरे सरकारनं राज्यपालांच्या या दौऱ्याला विरोध केल्यानंतरही आज राज्यपाल मराठवाड्यात रवाना होणार आहेत. मात्र, राज्यपालांच्या दौऱ्यात तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे.

राज्यपालांच्या नांदेडसह हिंगोली आणि परभणी जिल्ह्या दौऱ्यावर राज्य सरकारकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. त्याबाबत मुख्य सचिवांमार्फत राजभवनला कळवण्याबाबत मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपालांचा दौरा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होईल, असं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -