घरताज्या घडामोडीमहिला सुरक्षेसाठी कायद्यात सुधारणा करणार - राज्यपाल

महिला सुरक्षेसाठी कायद्यात सुधारणा करणार – राज्यपाल

Subscribe

महिला सुरक्षेसाठी उपाययोजना करताना त्यांच्या संबंधातील गुन्ह्यांबाबत त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे.

महिला सुरक्षेसाठी उपाययोजना करताना त्यांच्या संबंधातील गुन्ह्यांबाबत त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी कायद्यांमध्ये आवश्यक ती सुधारणा देखील केली जाईल, अशी घोषणा बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणात केली. तर युवकांच्या सुरक्षेबरोबरच नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथे आदिवासी युवकांकरिता क्रीडा अकादमी सुरु करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

राज्य विधी मंडळाचे विशेष अधिवेशन बुधवारी बोलविण्यात आले होते. त्यानिमित्ताने या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने करण्यात आली. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली. यावेळी पुन्हा एकदा मराठीत भाषण करुन त्यांनी सर्वांची मने जिंकली. तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या समाजसुधारकांनी घालून दिलेल्या मार्गाचे अनुसरण करत समाजातील वंचित घटकांचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी सर्वांना नववर्षांच्या शुभेच्या दिल्या, ते पुढे म्हणाले की, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, महिला व तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी शासन वचनबद्ध आहे. या घटकांच्या कल्याणाकरिता योजना आणि कार्यक्रमांची तत्परतेने अंमलबजावणी केली जाईल. तर महाराष्ट्र, कर्नाटक संबंधात राज्याने दावा केलेल्या ८६५ गावात राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेच्या हक्कांचे आणि विशेषाधिकारांचे संरक्षण करण्याचा पुनरुच्चार राज्यपालांनी यावेळी केला. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणांमध्ये राज्य शासन सातत्याने भूमिका मांडत राहील, अशी ग्वाही राज्यपालांनी यावेळी दिली.

- Advertisement -

रंगभूमी चळवळीचे संग्रहालय सुरु करणार

मराठी रंगभूमी चळवळीला १७५ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त मुंबई येथे या चळवळीचा इतिहास साकारणारे संग्रहालय सुरु करण्यात येईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

पदयात्रींसाठी मुलभूत सुविधा

राज्यातील तीर्थस्थळांचा विकास कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून अनेक भाविक शिर्डी येथे पदयात्रा करतात. या यात्रेकरुंसाठी सुविधा पुरविण्याकरीता पहिल्या टप्यात मुंबई ते शिर्डी या मार्गावर शौचालय, पिण्याचे पाणी यासारख्या मुलभूत सुविधा पुरविण्यात येतील. ग्रामीण जनतेला लाभदायी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजना देखील राबविण्यात येतील, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – नागपुरात काँग्रेसची भाजपला धोबीपछाड!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -