घरमहाराष्ट्रजयंतरावांची इच्छा म्हणून मी काही लगेच जाणार नाही; राज्यपालांची जोरदार बॅटींग

जयंतरावांची इच्छा म्हणून मी काही लगेच जाणार नाही; राज्यपालांची जोरदार बॅटींग

Subscribe

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लक्ष्य करत जोरदार फटकेबाजी केली. नेहमी अतिवृष्टी, पूर अशी संकटं असलेल्या भागातून मी आलो आहे. मी यायच्याआधी महाराष्ट्रात दुष्काळ स्थिती असायची, पण मी आल्यापासून इथेही पाऊस सुरु झाला आहे, पूर येतोय. त्यामुळे जयंत पाटील यांची इच्छआ आहे म्हणून मी लगेच परत जाणार नाही, अशी जोरदार बॅटींग राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.

राज्यपाल एवढ्यावरच न थांबता मी गेल्यास नुकसान होईल असं म्हणत आता काय नुकसान होत आहे का? अशी विचारणा देखील त्यांनी जयंत पाटलांनी केली. अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या फाऊंडेशनने आयोजित केलेल्या सांगलीतील पूरग्रस्त मुलींच्या सामुदायिक लग्न सोहळ व मदत कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, केंद्रीय मंत्री कपील पाटील, खासदार संजय पाटील आणि अभिनेत्री दिपाली सय्यद आदी व्यासपीठावर होते.

- Advertisement -

दोन पाटलांच्या मध्ये बसण्याची संधी मिळाली

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या कार्यक्रमात जोपरदार फटकेबाजी केली. दोन पाटलांच्यामध्ये (जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील)बसण्याची संधी मिळाली, असं राज्यपाल म्हणाले.

मी आलो अन् महापूर यायला लागले, असे समजून घेऊ नका

मी राज्यात राज्यपाल म्हणून आल्यानंतर इथे आपत्ती वाढल्या आहेत. महापूर येत आहेत. मी उत्तराखंडहून आलो. त्या भागात महापूर नेहमीचाच आहे. त्यामुळे मी येताना महापूर घेऊन आलोय आणि मी गेल्याशिवाय महापूर थांबणार नाही, असे तुम्ही समजून नका, असं देखील राज्यपाल म्हणाले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -