Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यपाल विमान उड्डाणाच्या वादानंतर आता मुख्यमंत्री सचिवालयाचं स्पष्टीकरण

राज्यपाल विमान उड्डाणाच्या वादानंतर आता मुख्यमंत्री सचिवालयाचं स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान उड्डाणाच्या वादानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यपालांच्या सचिवालयाने विमान उपलब्धतेची खातरजमा करायला हवी होती. विमान उड्डाणाला मान्यता नसल्याचा संदेश आदल्याच दिवशी दिला, असं मुख्यमंत्री सचिवालयाने म्हटलं आहे. ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हा वाद आता राज्यासाठी नवा राहिलेला नाही. त्यात आज नवा अंक जोडला गेला. आज घडलेल्या प्रकरावरुन राज्यातील राजकारण देखील तापलं आहे. दरम्यान, विमान उड्डाणाच्या वादावर राज्यपालांच्या सचिवालयाने स्पष्टीकरण दिल्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे आता राज्यपाल सचिवालय विरुद्ध मुख्यमंत्री सचिवालय असा नवा वाद सुरु होतो की काय? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज सरकारी विमानाने उत्तराखंडला जाणार होते. मात्र, त्यांना सरकारी विमानाने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली नसल्याने राज्यपाल विमानातून खाली उतरले. यानंतर राज्यातील राजकारण तापलं. या दरम्यान, राज्यपाल सचिवालयाने स्पष्टीकरण दिलं. या स्पष्टीकरणानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. “राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याआधी राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्यानं राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असं,” राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री सचिवालयाने दिलेल्या स्पष्टीकरणावरुन राज्यपाल सचिवालयाने खातरजमा केली नव्हती का? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्यपाल कार्यालयाने काय स्पष्टीकरण दिलं?

- Advertisement -

राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं कळवलं, असं राज्यपाल कार्यालयाने म्हटलं आहे. राज्यपाल कार्यालयाने याबाबत परिपत्रक काढलं आहे.


हेही वाचा – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वाद: राजभवनाकडून स्पष्टीकरण


- Advertisement -

 

- Advertisement -