घरमहाराष्ट्रराज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी सर केला कोंढाणा, महाराजांच्या आठवणींना दिला उजाळा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी सर केला कोंढाणा, महाराजांच्या आठवणींना दिला उजाळा

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्यपालांनी आज पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्याला (कोंढाणा) भेट दिली. यावेळी स्थानिक नागरिकांनी राज्यपालांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या होत्या. सिंहगडावर पोहचताच महिलांनी ओवाळून त्यांचं स्वागत केलं. गेल्यावर्षी याच दिवशी राज्यपालांनी शिवनेरी किल्ला सर केला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या ७९ व्या वर्षातही राज्यपाल कोश्यारी यांचा गड सर करण्याचा उत्साह वाखडण्याजोगा होता. अशाप्रकारे पायी चालत शिवनेरी किल्ला सर करणारे भगतसिंह कोश्यारी हे पहिले राज्यपाल ठरले आहेत. किल्ला सर करण्याचा राज्यपालांचा उत्साह पाहून उपस्थित अधिकारी वर्गही आश्चर्यचकित झाले. यामुळे राज्यपालांचा फिटनेसचे अधिकारी वर्गातून कौतुक होत आहे.

राज्यपालांनी यावेळी आमच्या उत्तराखंडमध्येही असेच गड असेच गड आहेत असं स्थानिकांना सांगितलं. तसेच उत्तराखंडमधील गड पाहण्यासाठी राज्यपालांनी स्थानिकांना आमंत्रण दिले. रविवारी एका कार्यक्रमानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पत्रकारांनी ‘आपण उद्या सिंहगडावर जाणार का?’ असा प्रशन विचारला होता. त्यावर कोश्यारी यांनी क्षणाचाही विलंब न करता ‘आप भी आ जाना’ असे उत्तर दिले. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपालांनी पायी चालत किल्ला सर करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

- Advertisement -

राज्यापालांच्या हस्ते गडावरील शिवाई देवीची आरती करण्यात आली होती. तसेच शिवनेरी गडावरील जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच दर्शन घेतलं. राज्यपालांनी सिंहगडावर पोहचताच लोकमान्य टिळक यांचे गडावरील निवासस्थान, नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी तसेच राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाला भेट दिली व उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.


महिला रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! IRCTC कडून मिळतेय कॅशबॅक आणि डिस्काऊंटची ऑफर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -