घरमहाराष्ट्रतुमच्याकडे राऊत तर आमच्याकडे रावत : भगतसिंग कोश्यारी

तुमच्याकडे राऊत तर आमच्याकडे रावत : भगतसिंग कोश्यारी

Subscribe

राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोशारी रविवारी वाशी येथे राहणाऱ्या उत्तराखंडमधील नागरिकांच्या कार्यक्रमाला आले होते. देवभूमी स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने बेलापूर येथील राजीव गांधीं क्रिडा संकुल मध्ये आयोजित उत्तराखंड प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.

नवी मुंबईः मी मराठीचे वाचन करत आहे. मराठी व पहाडी भाषेच्या अनेक शब्दांत साम्य आहे. आमच्याकडे पांडे आहेत तर इकडे देशपांडे आहेत. येथे राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहे, असा टोला राज्यपाल भगतसिंग यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव घेता लगावला.

राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोशारी रविवारी वाशी येथे राहणाऱ्या उत्तराखंडमधील नागरिकांच्या कार्यक्रमाला आले होते. देवभूमी स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने बेलापूर येथील राजीव गांधीं क्रिडा संकुलमध्ये आयोजित उत्तराखंड प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण माजी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते हस्ते पार पडले. यावेळी मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.

- Advertisement -

भाषणात कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल असलेल्या प्रेमाचाही उल्लेख केला.  ते म्हणाले, महाराष्ट्राचे लोक आमच्या पहाडी लोकांसारखे चांगलेच आहेत. पण शहरात दाऊद सारखे लोक देखील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला डिजिटलमंध्ये नंबर एकवर आणले आहे. आधी मुंबईचे फक्त क्रिकेटवर वर्चस्व होते. पण आता सगळयाच क्रिडा क्षेत्रात मुंबईचे वर्चस्व होण्यास सुरुवात झालेली आहे. आता आपण आणखी प्रयत्न देखील करायला हवेत. खेळासोबतच अन्य क्षेत्रातही आपल्याकडे प्राविण्य आहे. त्यातही आपण उत्तुंग कामगिरी करणे आवश्यक आहे. आपण आता कलेचा प्रसार करायला हवा, असा सल्ला कोश्यारी यांनी दिला.

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्विकारण्यात आला असून, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. यापूर्वी रमेश बैस यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे. रविवारी राष्ट्रपती कार्यालयाकडून याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय टोलेबाजी रंगली. विरोधकांनी कोश्यारी यांच्या राज्यपाल प्रवासावर टीका केली तर सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांच्या कामाचे कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -