राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी शिंदे-फडणवीसांना निमंत्रणच दिले नव्हते – नाना पटोले

शिंदे-फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निमंत्रणच दिले नव्हते, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. संबंधित माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आल्याचंही नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निमंत्रणच दिले नव्हते, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. संबंधित माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आल्याचंही नाना पटोलेंनी सांगितलं आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना नाना पटोलेंनी हा दावा केला. (Governor Not Invite Eknath Shinde And Devendra Fadnavis To Form Government Nana Patole Claim)

“खरं तर, माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत राजभवनातून एक पत्र मिळाले आहे. शिंदे-फडणवीसांना सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रणच दिले नव्हते, अशा पद्धतीचे पत्र राज्यपालांच्या कार्यालयातून मिळाले आहे. आम्ही अनेकदा सांगत आहोत की, हे सरकार असंविधानिक आहे. पण आता माहिती अधिकारातून आणखी मोठी माहिती समोर आली आहे”, असे नाना पटोले यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मागील सरकारच्या मंत्रिमंडळातील नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशारितने शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केली आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभाग घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपासोबत युती करत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

मात्र, हे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री असल्याचा असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. तसेच, सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.


हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राटेक परिसरातल्या डबक्यात तीन मुलं बुडाली? शोधमोहीम अद्याप सुरूच