घरताज्या घडामोडीवेळ देऊनही राज्यपालांनी मविआ नेत्यांची भेट नाकारली; नाना पटोले यांचा आरोप

वेळ देऊनही राज्यपालांनी मविआ नेत्यांची भेट नाकारली; नाना पटोले यांचा आरोप

Subscribe

मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यपालांच्या भेटीची वेळ घेण्यासाठी विचारणा करण्यात आली होती.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटण्यापेक्षा राज्यपाल आणि राज्य सरकारमधील संघर्ष वाढत चालला आहे. राज्यपाल भगतसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ नाकारली असल्यामुळे महाविकास आघाडीकडून टीका करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते राज्यापाल यांची भेट घेणार होते मात्र राज्यपालांनी भेट नाकारली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यापालांच्या भेटीसाठी वेळ मागण्यात आली होती आम्हाला कळवतो असे सांगण्यात आलं होते मात्र राजभवानाकडून भेटीची वेळ देण्यात आली नाही. यामुळे मिलिंद नार्वेकर यांना वेळ घेण्यासाठी पाठवण्यात आले असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वेळ देऊनही महाविकास आघाडी नेत्यांची भेट नाकारली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती झाल्यास भाजपमध्ये मोठी फूट पडेल अशी भीती भाजप नेत्यांना वाटत आहे. यामुळे आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला आहे. राज्य सरकारकडून राजभवनाकडे वेळ मागण्यात आली होती मात्र वेळ दिली नाही अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यपालांच्या भेटीची वेळ घेण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र राजभवानाकडून कळवतो असे सांगण्यात आलं होते परंतु काही सांगितले नाही यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातून मिलिंद नार्वेकर यांना राजभवनावर पाठवण्यात आलं असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

राजभवन हे भाजपचे कार्यालय आहे. राज्यपालांवर भाजपचा मोठा दबाव आहे. भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे बोलले जात आहे. यामुळे भाजपला या १२ जागांवर त्यांचे लोकं बसवायचे आहेत. यामुळे राज्यापालांच्या माध्यमातून खेळ करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे.

- Advertisement -

१ सप्टेंबरला मविआ नेते राज्यापालांची भेट घेणार

राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांची महाविकास आघाडीतील प्रमुख नेते १ सप्टेंबर रोजी भेट घेणार आहेत. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यापालांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांच्या भेटीची वेळ घेतली आहे.


हेही वाचा : महाविकास आघाडीचे नेते १ सप्टेंबरला घेणार राज्यपालांची भेट


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -