नोकरीच्या मागे न धावता रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजेत – राज्यपाल

governor said that employment opportunities should be created for the youth

शिक्षणाचे वैश्वीकरण होत असताना विद्यार्थ्यांनी कौशल्ये आत्मसात केली पाहिजे. जगात परिवर्तन घडविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असून केवळ नोकरीच्या मागे न धावता आपल्या कौशल्याचा वापर करून करून रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजेत. आत्मनिर्भर बनले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या 38 व्या दिक्षात समारंभात केले.

हेही वाचा – विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान

त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा –

संपूर्ण जगातच बेरोजगारी, महागाई हे प्रश्न आहेत. मात्र, त्यातून मार्ग काढून परिवर्तन करण्याची शक्ती युवकांमध्ये आहे. शिक्षण घेतल्यानंतर आपण सहजपणे समाजाने मला काय दिले, असा प्रश्न विचारतो, पण त्यापेक्षा आपण समाजाला काय दिले, याचा विचार करणे गरजेचे आहे. राज्यातील अनेक विद्यापीठांना संत-महापुरूषांची नावे दिली आहेत. त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळत असते. या संतांनी समाजासाठी त्यागभावनेतून जे काही केले, त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा, हा विचार त्यामागे आहे.

नव्या शिक्षण व्यवस्थेत आपण कोणत्याही शाखेचे ज्ञान मिळवू शकणार आहोत. अमेरीकेसारखा देश शिक्षणाची सुविधा देशात उपलब्ध करून देण्यास तयार आहे. अनेक पीएचडी झालेले युवक, उच्च शिक्षित पदवीधर शेती करून कृषी विकासात आपले योगदान देत आहेत. हॉर्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन भारतात आलेली हरियाणातील युवती गावची सरपंच बनली असून ग्रामविकासासाठी योगदान देत आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

हेही वाचा – आशिर्वाद घेण्यासाठी शरद पवारांची भेट : संजय राऊत

विद्यार्थ्यांनी राज्याला आपल्या गावाला विसरू नये –

विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. भारतातून अनेक विद्यार्थी परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी जातात. मात्र, पदवी घेतल्यानंतर किती पदवीधर देशात परततात हा संशोधनाचा विषय आहे. परेदशात उच्च शिक्षण घेऊन भारतात परत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ १५ ते २० टक्के आहे. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशाला, आपल्या राज्याला आपल्या गावाला विसरू नये, आपल्या देशाप्रती आपलेही उत्तरदायित्व आहे, हे या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.