१२ आमदारांबाबत लवकरच निर्णय; राज्यपालांच्या भेटीनंतर अजित पवारांची माहिती

राज्यपालांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली

governor take Decision on 12 MLAs soon said ajit pawar after meeting Governor koshyari
१२ आमदारांबाबत लवकरच निर्णय; राज्यपालांच्या भेटीनंतर अजित पवारांची माहिती

महाविकास आघाडी सरकारचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांच्या लवकर निर्णय घेतो असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते राज्यपाल सकारात्मक असून लवकर निर्णय घेतील अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राज्यपालांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि अतिवृष्टीच्याबाबतीत माहिती जाणून घेतली असल्याचेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यापलांना १२ आमदारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विनंती केली असल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि राज्यपालांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली आहे. या चर्चेची माहिती अजित पवार यांनी देताना म्हटलं आहे की, राज्य सरकारने ठराव करुन १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती. या यादीला अनेक दिवस झाले त्यावर कार्यवाही झाली नसल्यामुळे राज्यपालांना विनंती केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदाराच्या नियुक्तीचा अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत लवकर निर्णय घेतो असे म्हटलं असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

तपास यंत्रणांना नेते सहकार्य करतील

शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. भाजपची जनआशीर्वाद यात्रा संपताच ईडीची कारवाईवर अजित पवार यांनी म्हटलं आहे की, “एक गोष्ट तितकीच खरी आहे की, ज्यावेळी यात्रा संपली आणि नोटीस आली ही वस्तुस्थिती आहे. परंतु यामागे काय कारण आहे. काय माहिती मिळाली आहे. याबाबत ते प्रश्न विचारु शकतात. ज्या व्यक्तिला नोटीस आली आहे ती व्यक्तीही वकिलांकडून माहिती घेऊन उत्तर देऊ शकतील” असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती दिली आहे. कोरोनाच्या संदर्भातील परिस्थिती काय?, वैद्यकीय परिषदेबाबत सांगितले. केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात दहीहंडी, गणेशोत्सव अशा कार्यक्रमांदरम्यान महाराष्ट्रात गर्दी होते. रस्त्यावर नागरिक मोठ्या प्रमाणात पडत असतात. केरळमध्येही अशाच एका सणादरम्यान नागरिक बाहेर पडले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केंद्र सरकारने देखील महाराष्ट्राला नोटीस जारी करुन निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याच्यातील दुर्दैवाने राजकारण करत म्हणत आहेत की, या सरकारला सणांबाबत आपलेपणा नाही म्हणून जाणीपुर्वक परवानगी देत नाहीत असे नाही.

महाविकास आघाडी सरकार हे सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारे हे सरकार आहे. हे सगळं करत असताना आपण सण साजरे करु पण त्यापुर्वी माणसाचे आरोग्य आणि माणसाचे प्राण वाचवण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात करत आहोत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, १२ आमदार नियुक्तीबाबत तोडगा निघण्याची शक्यता