Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र महाराष्ट्राचे आतापर्यंत झालेले राज्यपाल एका क्लिकवर

महाराष्ट्राचे आतापर्यंत झालेले राज्यपाल एका क्लिकवर

Subscribe

विशेष म्हणजे महाराष्ट्रात या आधीही अनेक राज्यपाल होऊन गेलेत, त्यांची यादीच आपलं महानगर आणि माय महानगरच्या हाती लागली आहे.

मुंबईः देशातील काही राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले असून, अनेक राज्यांमध्ये फेरबदल दिसून आलेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असायचे. आता त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे दिलेला राजीनामा स्वीकारण्यात आला असून, त्यांच्या जागी रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवण्यात आले आहे. तसेच राधा कृष्णन माथूर यांचा लडाखच्या नायब राज्यपालपदाचा राजीनामाही स्वीकारण्यात आला असून, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात या आधीही अनेक राज्यपाल होऊन गेलेत, त्यांची यादीच आपलं महानगर आणि माय महानगरच्या हाती लागली आहे.

महाराष्ट्राचे आतापर्यंत झालेले राज्यपाल आणि त्यांचा कार्यकाळ

- Advertisement -

>> श्री प्रकाश / 1-5-1960 ते 16-4-1962

>> डॉ. पू. सुबरायण / 17-4-1962 ते 6-10-1962

- Advertisement -

>> विजया लक्ष्मी पंडित/ 28-11-1962 ते 18-10-1964

>> पी. व्ही. चेरियन/ 14-11-1964 ते 8-11-1969

>> अली यावर जंग/ 26-2-1970 ते 11-12-1976

>> सादिक अली/ 30-4-1977 ते 3-11-1980

>> एअर चीफ मार्शल ओ. पी. मेहरा, पीव्हीएसएम (सेवानिवृत्त)/ 3-11-1980 ते 5-3-1982

>> आय. एच. लतीफ, PVSM (RETD)/ 6-3-1982 ते 16-4-1985

>> कोना प्रभाकर राव / 31-5-1985 ते 2-4-1986

>> डॉ. शंकर दयाळ शर्मा / 3-4-1986 ते 2-9-1987

>> के. ब्रह्मानंद रेड्डी/ 20-2-1988 ते 18-1-1990

>> सी.सुब्रमण्यम / 15-2-1990 ते 9-1-1993

>> डॉ. पी. सी. अलेक्झांडर/ 12-1-1993 ते 13-7-2002

>> मोहम्मद. फजल/ 10-10-2002 ते 5-12-2004

>> एस.एम. कृष्णा/ 6-12-2004 ते 8-3-2008

>> एस सी जमीर/ 19-7-2008 ते 21-1-2010

>> के. शंकरनारायणन/ 22-1-2010 ते 24-8-2014

>> सी. एच. विद्यासागर राव/ 30-8-2014 ते 5-9-2019

>> भगतसिंह कोश्यारी/5-9-2019 ते 12-02-2023

खरं तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लडाखचे नायब राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचे राजीनामे स्वीकारून मोठ्या प्रमाणावर नवीन राज्यपालांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. बिहार, झारखंडसह 13 राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत.

या 13 राज्यांना मिळाले नवीन राज्यपाल

1) लेफ्टनंट जनरल (निवृत्त) कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांना अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.

2) लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची सिक्कीमचे राज्यपाल करण्यात आले आहे.

3) सी. पी. राधाकृष्णन यांना झारखंडचे नवे राज्यपाल बनवण्यात आलेय.

4) शिवप्रताप शुक्ला हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल झाले आहेत.

5) गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

6) अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या खंडपीठाचा भाग असलेले न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नझीर यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल करण्यात आलेय.

7) आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वा भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

8) छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

9) मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांची नागालँडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

10) बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

11) हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

12) झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

13) ब्रिगेडियर बी.डी. मिश्रा (निवृत्त) यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचाः …नाहीतर पुन्हा एकदा संघर्ष होईल, नव्या राज्यपालांना राऊतांचा इशारा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -