राज्यपालांची स्वाक्षरी : तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा मार्ग मोकळा

मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीवरील चर्चाना पूर्णविराम

state election commission decide Municipal elections will be held in one member ward system

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. त्यामुळे मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीचा मार्ग आता खर्‍या अर्थाने मोकळा झाला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या २२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांसाठी तीन सदस्यीय प्रभाग पध्दती, नगरपरिषदेसाठी दोन तर नगर पंचायतीसाठी एक सदस्यीय प्रभाग पध्दतीचा निर्णय घेण्यात आला होता.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता राज्यपाल कोश्यारी यांनी यासंदर्भातील अध्यादेशावर सही केली आहे. त्यामुळे मुंबई सोडून इतर महापालिकांमध्ये आगामी निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होतील. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून संबंधित महापालिकांना सूचना दिल्या जातील.

मुदत संपलेल्या महापालिका

नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर.

२०२२ मध्ये निवडणूक होणार्‍या महापालिका

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, अमरावती, अकोला, भिवंडी- निजामपूर, पनवेल, मीरा- भाईंदर, मालेगाव, परभणी, लातूर, नांदेड- वाघाळा, चंद्रपूर.

डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत २२२ नगरपालिका/ नगरपंचायतींच्या मुदती संपणार आहेत.