घरमहाराष्ट्रकॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आरोप निश्चित नाही; 23 ऑगस्टला पुढील सुनावणी

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आरोप निश्चित नाही; 23 ऑगस्टला पुढील सुनावणी

Subscribe

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या आजच्या सुनावणीत संशयित आरोपीवर आरोप निश्चित होऊ शकले नाही. आजच्या सुनावणीत 7 संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. यावेळी आरोप निश्चिती केली जाणार आहे. दरम्यान आजच्या सुनावणीत संशयितांचे नातेवाईकही न्यायालयात उपस्थित होते.

गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र याबाबत अधिकृत आदेश समोर आलेला नाही, यामुळे आदेशात कोणता उल्लेख आहेत का हे माहीत नसल्याने सुनावणी कामकाज चालवणे योग्य होणार नाही, अस म्हणत पुढील सुनावणीसाठी अॅड शिवाजीराव राणे यांनी न्यायालयाकडे पुढील तारीख मिळण्यासाठी विनंती केली आहे. या मागणीला आरोपींचे बाजून लढणारे वकील अॅड समीर पटवर्धन यांनी समंती दर्शवली आहे. यानंतर जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी परवानगी दिली आहे.

- Advertisement -

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येचा तपास एटीएसकडे

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आता 7 उलटून गेली. अखेर सात वर्षानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे बुधवारी सुपूर्द केला आहे. दरम्यान एसआयटीतील काही अधिकारी देखील आता एटीएसला तपासात सहकार्य करणार आहेत. पानसरे कुटुंबीयांनी न्यायालयात हा तपास एटीएसकडे देण्याची मागणी केली होती. आतापर्यंत पानसरेंच्या हत्येचा तपास सीआयडीने स्थापन केलेले विशेष तपास पथक (एसआयटी) करत होते. मात्र या प्रकरणाच्या तपासात एसआयटीला तपासात यश आलेले नाही.

त्यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करावा, अशी विनंती करणारा अर्ज पानसरेंच्या कुटुंबीयांकडून अॅड अभय नेवगी यांच्याद्वारे गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. यानंतर बुधवारी झालेल्या सुनावणीत न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांनी पानसरे कुटुंबीयांनी केलेला अर्ज मंजूर करत तपास एसआयटीकडून एटीएसकडे वर्ग केला. यामुळे एसआयटीतील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने आता एटीएस तपासात करणार आहे.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -