Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी बिल दिल्यानंतर विक्रेते मागतात मोबाईल नंबर..., ग्राहक मंत्रालयाचा मोठा निर्णय

बिल दिल्यानंतर विक्रेते मागतात मोबाईल नंबर…, ग्राहक मंत्रालयाचा मोठा निर्णय

Subscribe

आपण एखाद्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये जेवणासाठी जातो. तेव्हा ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून मोबाईल नंबर मागितला जातो. गरज नसतानाही ग्राहकांना आपला मोबाईल नंबर द्यावा लागतो आणि ग्राहक सहजपणाने आपला नंबर देतात. परंतु यापुढे आता कोणत्याही दुकानदाराला मोबाईल नंबर देण्याची गरज भासणार नाही, याबाबत ग्राहक मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे.

दुकानात खरेदी केल्यानंतर बिल देताना ग्राहकांना मोबाईल नंबर मागितला जातो. यासंदर्भात ग्राहकांच्या अनेक तक्रारी मंत्रालय आणि संबंधित विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. ग्राहकांच्या या तक्रारीची दखल घेऊनच मंत्रालयाकडून लवकरच एक आदेश जारी केला जाणार आहे. याप्रकरणी सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितलं की, अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर केंद्राकडून एडवायजरी जारी करण्यात येत आहे.

- Advertisement -

ग्राहकांनी मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्यास अनेक दुकानदार वा विक्रेत्यांकडून सर्व्हीस देण्यास नकार देण्यात येतो. तसेच, मोबाईल नंबर न दिल्यास ते बिल जनरेट करत नाहीत. ग्राहक संरक्षण अधिनियम अंतर्गत हा एक अनुचित आणि प्रतिबंधात्मक व्यापार चलन आहे.

ग्राहकांना खरेदी करताना किंवा हॉटेलमध्ये बिल भरताना मोबाईल नंबर देणे बंधनकारक असणार नाही. अनेकदा मोबाईल नंबर दिल्याशिवाय संबंधित सेवा मिळत नाही. मात्र, सेल्सपर्सन हे गाहकांना मोबाईल नंबर देण्याची सक्ती करू शकत नाहीत. त्यामुळे आता हे आदेश कधी जारी होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा : Mumbai AC Local: एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचा संताप


 

- Advertisment -