Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र ...आता सरकार तोंडावर पडले, 'त्या' प्रकरणावरून संजय राऊतांची टीका

…आता सरकार तोंडावर पडले, ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांची टीका

Subscribe

मुंबई : भीमा-पाटस साखर कारखाना घोटाळा प्रकरणी भाजपा आमदार राहुल कुल यांच्या सीबीआय चौकशीची मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली होती. पण या कथित घोटाळ्यात राज्य शासनाकडून आमदार राहुल कुल यांना क्लीन चिट देण्यात आली. तर, आता साखर आयुक्तालयाकडून जप्तीचे आदेश जारी झाल्याचे सांगत खासदार संजय राऊत यांनी, सरकार खोटे बोलले आणि आता तोंडावर पडले. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

भाजपा आमदार राहुल कुल यांनी पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. याबाबतचे पत्र त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लिहिले होते. राहुल कुल यांनी 2016 ते 2022 या काळात गळीत हंगाम बंद असताना खुल्या बाजारात साखरेची विक्री केली. इतकेच नव्हे तर, कारखान्याने बँकांचे थकीत कर्ज बुडवल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. म्हणूनच, राहुल कुल यांची ईडी आणि सीबीआयमार्फेत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

हेही वाचा – देशाला धूमकेतूवरही उतरवून संशोधन…, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

- Advertisement -

चौकशी समितीने दिलेल्या लेखी अहवालानुसार, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या 2021-22 अखेरच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे 2022-23चा लेखापरीक्षण अहवाल अद्याप पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये राहुल कुल यांनी कोणताही घोटाळा केला नसल्याचेच दिसत आहे. त्यामुळे त्यांना सध्या दोषी ठरवण्याचा प्रश्न येत नसल्याचे सरकारने विधिमंडळात म्हटले होते. यावरून संजय राऊत यांनी संतापही व्यक्त केला होता.

हेही वाचा – स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर वडेट्टीवार यांची टीका

आता संजय राऊत यांनी ट्वीट कर, साखर आयुक्तालयाच्या कारवाईची माहिती दिली. दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे 5 कोटी 78 लाख रुपये थकवल्यामुळे साखर आयुक्तालयाकडून जप्तीचे आदेश निघाले आहेत. शेतकऱ्यांच्या लढ्याचा हा विजय आहे. आता प्रश्न इतकाच आहे की, आमदार राहुल कुल यांना वाचवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत आमदार कुल यांना क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला. सरकार खोटे बोलले व आता तोंडावर पडले. राहुल कुल यांनी 500 कोटीचे मनी लाँड्रिंग केले आहे, ते सिद्ध होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

- Advertisment -