Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यातील पुरग्रस्तांना येत्या दोन दिवसांमध्ये जीआर काढून मदत जाहीर करु - विजय...

राज्यातील पुरग्रस्तांना येत्या दोन दिवसांमध्ये जीआर काढून मदत जाहीर करु – विजय वड्डेटीवार

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोकण, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे भीषण पुरस्थिती निर्माण झाली. या महापूरात हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली तर लाखो शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झालीत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी पत्रकार परिषद घेत एक दोन दिवसांमध्ये नुकसानग्रस्त भागातील प्रति हेक्टरी जी मदत जाहीर होणार होईल त्यासंदर्भातील जीआर लवकरचं काढणार आहोत. असे आश्वासन दिले. त्यामुळे महापूरामुळे नुकसान झालेल्या पुरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून लवकरचं मदत जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

यावर बोलताना वड्डेटीवार म्हणाले की, एक दोन दिवसांमध्य़े प्रति हेक्टरी जाहीर होणाऱ्या मदतीसंदर्भातील जीआर लवकरचं काढणार आहोत. काही वेळा निकष बदलून मदत करणाऱ्याचे काम केले आहे. राज्य सरकार आर्थिक संकटाला तोंड देत आहे, असं ते म्हणाले.

- Advertisement -

”राज्यात महाविकास आघाडी सरकारचं सरकार स्थापनं झालं. त्या सरकारमध्ये मदत पूनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याची जबाबदारी दिली. हे खातं सांभाळताना १६ हजार ७०० कोटी रुपये शेतकऱ्याला विविध संकटामध्ये मागील वर्षी सरकार आल्यापासून दिले. यावर्षीची मदत देणे बाकीच आहे. यंदाच्या नुकसानीचा आकडा ७ लाख हेक्टर इतका आहे. महापुरात कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागातील अंतिम आकडेवारी येतेय. मात्र मागच्या पुराची आणि आत्ताच्या पुराची आत्तापर्यंत आलेल्या आकडेवारीत ७ लाखांच्यावर शेतीचे नुकसान झाले. कालच यासंदर्भात बैठक झाली. असेही वड्डेटीवार यांनी सांगितले.


नागपूरमध्ये तिसऱ्या लाटेच्या निर्बंधांबाबत दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दुमत 


 

- Advertisement -