घरताज्या घडामोडीसरकारने कोरोनाचा कौतुक सोहळा बंद करुन नाट्यगृह आणि चित्रपटगृह 100 टक्के आसनक्षमतेने...

सरकारने कोरोनाचा कौतुक सोहळा बंद करुन नाट्यगृह आणि चित्रपटगृह 100 टक्के आसनक्षमतेने सुरु करावी – मनसेचा हल्लाबोल

Subscribe

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र हॉटेल्स, मॉल्स सर्व काही पूर्णक्षमतेने सुरु असताना, नाट्यगृह आणि चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु करावे असे, अशी मागणी मनसे चित्रपट सेनेने केली आहे.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र हॉटेल्स, मॉल्स सर्व काही पूर्णक्षमतेने सुरु असताना, नाट्यगृह आणि चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु करावे असे, अशी मागणी मनसे चित्रपट सेनेने केली आहे. “पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटापासून 100 टक्के आसनक्षमता सुरु करा. कारण, मॉल्स,हॉटेल्समध्ये लोकांची झुंबड असते तर नाट्यगृह आणि चित्रपटगृह फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यात आले आहेत,  हा राज्य सरकारचा अजब न्याय आहे”, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) यांनी केला आहे. “खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हापासून कोरोना कंट्रोलमध्ये आलेला आहे तेव्हापासून मी मागणी करत आहे की, तुम्ही सर्व गोष्टी हळूहळू सुरु करत आहात, मग नाट्यगृह आण चित्रपटगृहांना अशी वागणूक का?”, असा सवाल त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्यसरकारला केला आहे.

पब्ज,नाईट लाईफ हे तुमच्या इच्छेनुसार सुरु, मग…

“सर्व रेस्टॉरंट सुरु असून ते संपूर्णपणे फुल आहेत. त्याठिकाणी 50 टक्क्यांनी आसनक्षमता नाही आहे. तुमचे सर्व पब्ज,नाईट लाईफ हे तुमच्या इच्छेनुसार सुरु आहे. तुमचे मॉल्स जोरात चालू आहेत. याशिवाय बेस्ट बस आणि रेल्वेमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. मला असं वाटतंय इतकं सर्व सुरक्षित असताना आणि काही ठिकाणी लोक मास्कसुद्धा वापरत नाही आहेत, असा अमेय खोपकर म्हणाले.

- Advertisement -

राज्य सरकारने कोरोनाचा कौतुक सोहळा बंद करुन…

इतकं सर्व सुरळीत चालू असताना, मला असं वाटतं राज्य सरकारने कोरोनाचा कौतुक सोहळा बंद करुन नाट्यगृह आणि चित्रपटगृह 100 टक्के आसनक्षमतेने सुरु करावी ही मनसे चित्रपट सेनेची मागणी असल्याचे अमेय खोपकर यांनी सांगितले.

‘लहान तोंडी मोठा घास,पण आता बोलायला हवे’…- प्राजक्ता माळी

प्राजक्ताचा ‘पावनखिंड’ हा सिनेमा रिलीजच्या वाटेवर असून,सरकारने चित्रपटगृह 100 टक्के आसनक्षमतेने सुरु करावी, अशी राज्य सरकारने कळकळीची विनंती केली आहे. ‘लहान तोंडी मोठा घास,पण आता बोलायला हवे’,  अशा आशयाचे कॅप्शन प्राजाक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवर व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

- Advertisement -

‘पावनखिंड’चा ट्रेलर प्रदर्शित

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभूतपूर्व कारकिर्दीतील त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या शिवराज अष्टका’तील ‘पावनखिंड’ हे तिसरं पुष्प आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या रक्ताने इतिहासाच्या विजयी पराक्रमाचे पान पावनखिंड या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. कोरोना काळात लांबणीवर पडलेल्या सिनेमांपैकी पावनखिंड हा सिनेमा असून अखेर येत्या १८ फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 


हे ही वाचा – Prajaktta Mali Post : ‘लहान तोंडी मोठा घास, पण.. ; प्राजक्ता माळीची राज्य सरकारला कळकळीची विनंती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -