अमरावती : “सरकारने पायउतार व्हावे, अन्यथा जनता जागा दाखवेल”, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यावरून नाना पटोलेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रसेची आजपासून जनसंवाद यात्रा काढली आहे. काँग्रेसची ही यात्रा अमरावती आष्टी येथून प्रारंभ झाला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. काँग्रसेची ही यात्रा आज 22 किलोमीटर चालेल आणि दररोज सकाळी सात वाजता या यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली.
जालनात लाठीचार्जा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, “पोलीस अधिक्षकांचा काय दोष?, सरकारने आदेश दिलेले आहेत. सौम्य लाठीचार्ज करण्याचा, तर सरकार दोषी आहे. कुठल्या आधारे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी सरकारच्या आदेशाचे पालन केले आहे. यामुळे पोलीस विभाग दोषी नाही. सरकार दोषी आहे सरकारवर कारवाई व्हावी. सरकारने पायउतार व्हावे, अन्यथा जनता जागा दाखवेल.”
हेही वाचा – आज मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे निषेध आंदोलन
लोकांनी आत्महत्या करू नका
महाराष्ट्रा शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत जात आहेत. तरुण आणि गरीबांच्या आत्महत्या वाढत जात आहेत. लोकांचे जगने मुश्किल झाले आहे. यामुळे काँग्रेसच्या यात्रेतून लोकांना हिम्मत देणार आहोत. तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे आणि भाजपने जगण्याचा अधिकार देखील हिरावून घेतला आहे. यामुळे तुम्ही आत्महत्या करू नका. आम्ही तुम्हाला न्याय देऊन हे यात्रेतून लोकांना सांगण्याचा प्रयत्न आहे.”