घरमहाराष्ट्र‘जलयुक्त’वर कोट्यवधीचा खर्च !

‘जलयुक्त’वर कोट्यवधीचा खर्च !

Subscribe

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान चार वर्षांपूर्वी सुरू केले. यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीमार्फत चार वर्षांत २७१ गावांचे आराखडे बनविण्यात येऊन ४ हजार ४२३ कामे हाती घेण्यात आली. यासाठी १३७ कोटी ७७ लाख १२ हजार रुपये निधी प्रकल्प खर्च म्हणून मंजूर करण्यात आला. यातील बहुंताश कामे पूर्ण होऊन कोट्यवधीचा खर्च झाला असला तरी रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाई कमी झालेली नसल्याचे चित्र दिसत आहे.

शासनाने ५ डिसेंबर २०१४ रोजी जलयुक्त शिवाय अभियान राबविण्यास सुरूवात केली. या अभियानात कृषी विभाग, लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वन विभाग इत्यादींचा सहभाग आहे. यामध्ये कृषी विभागाने जलयुक्त शिवार अभियानात पुढाकार घेत सर्वाधिक, 3 हजार ७२० कामे केली आहेत. हा कामांचा आवाका फार मोठा असला तरी प्रत्यक्षात पाणीटंचाई कमी होण्यात याची किती मदत झाली याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

गेल्या चार वर्षांच्या कालावधीत कृषी विभाग वगळता लघुसिंचन (जलसंधारण) विभागाने ४६, वन विभाग 468, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग (जि. प.) १८९ जलयुक्त शिवारची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये २०१५-१६ मध्ये चारही विभागांनी घेतलेले उद्दिष्टे पूर्ण केली आहे. त्यासाठी ३०.८८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामुळे निर्माण झालेले सिंचन क्षेत्र २ हजार ४८० हेक्टर आहे. यावर्षी ४५ गावे निवडली असून, त्यातून ९७० कामे प्रस्तावित केली होती. त्यातील कृषी विभाग ९०३, वन विभाग ४४, लघुसिंचन (जलसंधारण) विभाग १७, व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ६ कामे केली आहेत.

या वर्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. पहिल्या तीन वर्षात जी कामे झाली त्या प्रमाणात या वर्षी ५० टक्केसुद्धा कामे झालेली दिसत नाहीत. जल युक्त शिवार अभियानाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी असून, जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके सचिव म्हणून काम पाहत आहेत. गावांची निवड करताना आमदार, ग्रामपंचायत यांच्याकडून आलेले अर्ज व जिल्हा परिषदे मार्फत ज्या गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो. या सर्व गावांची यादी बनवून सभेत सादर केली जाते. जिल्हा समितीच्या सभेत जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने गावांची निवड केली जाते.

- Advertisement -

जलयुक्त शिवार अभियानामुळे अनेक गावांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. या अभियानामुळे पाणीटंचाई कमी होत असून त्याचा जनतेला चांगला फायदा होत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी कामे कमी झाली असली तरी उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील.
-पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -