हळूहळू सर्व बाहेर येणार, पहाटेच्या शपथविधीवरून फडणवीसांचा पुन्हा इशारा

Devendra Fadnavis on Early Morning Swearing | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर रोख ठेवत काही गौप्यस्फोट केले आहेत. एवढंच नव्हे तर हळूहळू सर्व गोष्टी बाहेर येतील, असंही ते म्हणाले.

Devendra-Fadnavis

Devendra Fadnavis on Early Morning Swearing | पुणे – 2019 साली विधानसभा निवडणुकांनंतर मोठा राजकीय पेच (Maharashtra Political Crises) निर्माण झाला होता. शिवसेना (Shivsena) आणि भाजपाची (BJP) युती तुटल्याने राज्याच्या गादीवर कोण बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सर्वच पक्ष सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव करत असतानाच भल्या पहाटे भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी राजभवनात जात शपथविधी केला. या घटनेला तीन वर्षे उलटून गेली असली तरीही या शपथविधीची चर्चा आजही राजकीय वर्तुळात रंगत आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर रोख ठेवत काही गौप्यस्फोट केले आहेत. एवढंच नव्हे तर हळूहळू सर्व गोष्टी बाहेर येतील, असंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आधी काय म्हणाले होते?

शरद पवारांच्या सल्ल्यानेच पहाटेचा शपधविधी झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात केला होता. त्यांच्या या विधानानंतर राज्यभर बरीच खळबळ माजली.

हेही वाचा – मी शंभर टक्के सत्यच बोललो, पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्यावर फडणवीस ठाम

शरद पवारांचं प्रत्युत्तर

पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यात जी राष्ट्रपती राजवट लागू होणार होती ती उठली” असं फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

हेही वाचा – पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवारांनी मौन सोडलंच! म्हणाले…

फडणवीसांचा पुन्हा गौप्यस्फोट

शरद पवारांच्या प्रत्युत्तरानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हळूहळू सर्व गौप्यस्फोट बाहेर येत आहेत. मी जे बोललो तेच कसं खरं होतं, हे तुम्हाला हळूहळू समजत आहे. मात्र सध्या तुम्हाला अर्धेच समजलेले आहे. अर्धे समजायला अद्याप वेळ आहे.”

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पहाटेच्या शपथविधीबाबत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक वाक्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.